उदयनराजेंची 'ती' व्हिडिओ क्लिप व्हायरल

Udyanraje Bhosle
Udyanraje Bhosle

सातारा : साताऱ्यात डॉल्बीचा आवाज घुमला रे घुमला अशा स्वरुपाची खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची जुनी व्हिडिओ क्‍लिप सोशल मिडियातून व्हायरल करुन साताऱ्यातील अनंत चतुर्दशी दिवशीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या "श्रीं'ची डॉल्बी विरहीत आदर्श मिरवणुकीच्या लौकिकाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला. नागरिकांच्या डॉल्बीबाबत दिशाभुल करणारी क्‍लिप व्हायरल करणाऱ्यांचा पोलीसांनी वेळीच मुसक्‍या आवळल्या पाहिजेत असे मत व्यक्त होऊ लागले आहे. 

साताऱ्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही परिस्थितीत यंदा मिरवणुकीत डॉल्बी लागणार नाही. याची पूरेपूर काळजी पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी घेतली. त्यांच्या प्रयत्नांना मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद देत डॉल्बीचे विसर्जन केले. चार-पाच वर्षांपूर्वी गणेश विसर्जन मिरवणूकीत रात्री 12 नंतर पोलिसांनी डॉल्बी वाजिवण्यास बंदी केली की खासदार उदयनराजे भोसले मंडळांच्या बाजूने ठामपणे उभे राहत. त्यांच्या निर्भयी निर्णयाने डॉल्बीचा आवाज चढयाचा आणि पून्हा काळजात धस्स व्हायचे. कर्णकर्कश आवाजाच्या तालातच युवा वर्ग रात्रभर झिंगायचा. 

तत्कालीन पोलिस अधिक्षक के. एम. एम. प्रसन्ना यांनी ही परिस्थिती बदलली. रात्री 12 नंतर डॉल्बीचा आवाज बंद झाला. त्यानंतर डॉ. अभिनव देशमुख, संदीप पाटील हे अधिकारी साताऱ्यात आले. प्रसन्नांनी केलेले प्रयत्नांमध्ये भर टाकत संदीप पाटील यांनी डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणुकीचा कळस चढविला. पोलिसांच्या प्रयत्नांना 
मंडळांनी, लोकप्रतिनिधींनी बळ दिल्यानेच हे शक्‍य झाले हे ही तितकेच खरे. 

सोशल मिडीयावर क्लिप व्हायरल
फेसबुकवरील भाऊ कदम रॉक्‍स - बाकीचे वासाडे सॉक्‍स या ग्रुपबरोबरच काही जणांनी खासदार उदयनराजे भोसले यांनी लावा डॉल्बी मी बघतो... अशा स्वरुपाची क्‍लिप नुकतीच पोस्ट झाली. अवघ्या 20 तासात ही क्‍लब 3 हजार जणांनी शेअर केली. त्यातून सुमारे दोन लाख एक व्ह्यूजचा टप्पा पार केला. व्हॉटसऍपच्या माध्यमातून देखील असंख्य लोकांपर्यंत ही क्‍लिप पोहचली. यामुळे साताऱ्यात डॉल्बीचा आवाज घुमला घुमला... अशी चर्चा जगभरात होऊ लागली. जी गोष्ट घडलीच नाही ती लोकांपर्यंत पोहचली. या प्रकाराने सातारा पोलिसांवरील विश्‍वास डळमळीत होऊ शकतो. दूसरीकडे खासदार उदयनराजे भोसले यांच्या बाबतीत ही तसेच होऊ लागले आहे. त्यांची बेधडक कृती सर्वांना ज्ञात असली तरी सध्या डॉल्बी वाजविण्याच्या बाबतीत लोकांच्या भावना तीव्र आहेत. त्यावर बंदीच असली पाहिजे अशी वेळी खासदार उदयनराजेंची जूनी व्हिडिओ क्‍लिप पोस्ट करुन उदयनराजेंचा डॉल्बी बंदीस विरोध असा संदेश लोकांपर्यंत गेला आहे. हीच क्‍लिप नव्हे तर त्यांच्या पुर्वीच्या कार्यपद्धतीच्या काही क्‍लिप सोशल मीडियाद्वारे फिरविल्या जाताहेत. हे खासदार भोसले यांच्या सध्याच्या प्रतिमेस मारक ठरत असल्याची चर्चा समर्थकांमध्ये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com