मराठा मोर्चाची तयारी जोमात; एक ऑगस्टला दहिवडीत बैठक

रुपेश कदम
रविवार, 30 जुलै 2017

एक ऑगस्ट रोजी दुपारी साडे बारा वाजता दहिवडी येथील सिध्दनाथ मंगल काऱ्यालयात तालुकास्तरीय भव्य बैठकीचे आयोजन

मलवडी : मुंबई येथे 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज रविवार 30 जुलै 2017 रोजी दुपारी 1 वाजता दहिवडी येथील शासकीय विश्रामगृहात समस्त माण तालुका मराठा समाज समन्वयकांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत एक ऑगस्ट रोजी दुपारी साडे बारा वाजता दहिवडी येथील सिध्दनाथ मंगल काऱ्यालयात तालुकास्तरीय भव्य बैठकीचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

9 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मराठा समाजाच्या महामोर्चाची प्रत्येक तालुक्यात जोरदार तयारी सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून माण तालुका मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. विश्रामगृहात झालेल्या बैठकीस तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सदर बैठकीत मोर्चाच्या नियोजनासंबंधी महत्वपुर्ण विषयावर चर्चा झाली. तसेच तालुक्यातील मराठा समाजाची तालुकास्तरीय भव्य बैठक मंगळवार एक ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता सिद्धनाथ मंगल काऱ्यालय दहीवडी येथे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

सदर बैठकीचा अहवाल तयार करण्यात आला असून एक ऑगस्टच्या बैठकीचं निवेदन दहिवडी पोलिस ठाण्यात देण्यात आले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :