लोणंदला युवकाचा शस्त्राने वार करुन खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

इंदिरानगर व लोणंदमध्ये खळबळ उडाली आहे. सुनिल कांबळे हा चालक म्हणून येथे काम करत होता. आई, वडिल व लहान भाऊ समवेत तो इंदिरानगर येथे राहात होता. दरम्यान आज संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास तो येथील मातोश्री मेडिकलच्या कठ्ठ्यावर बसला असताना अचानक कोणीतरी येवून त्याला मेडिकल दुकानाच्या पाठीमागे बोलवून त्याच्या छातीत, तोंडावर व हातावर धारधार शस्त्राने वार करून खून केला.

लोणंद : लोणंद येथील इंदिरानगर येथे राहणारा युवक सुनिल उर्फ सोन्या दिगंबर कांबळे (वय 26) यांचा आज (ता.29) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आज्ञाताने धारधार शस्त्राने वार करुन खून केला आहे.

दरम्यान या घटनेमुळे इंदिरानगर व लोणंदमध्ये खळबळ उडाली आहे. सुनिल कांबळे हा चालक म्हणून येथे काम करत होता. आई, वडिल व लहान भाऊ समवेत तो इंदिरानगर येथे राहात होता. दरम्यान आज संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास तो येथील मातोश्री मेडिकलच्या कठ्ठ्यावर बसला असताना अचानक कोणीतरी येवून त्याला मेडिकल दुकानाच्या पाठीमागे बोलवून त्याच्या छातीत, तोंडावर व हातावर धारधार शस्त्राने वार करून खून केला. या घटनेची माहिती लोणंद पोलिस ठाण्यात मिळताच लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संदिप भोसले व त्यांचे सहकारी त्वरीत घटनास्थळी पोचले. त्यावेळी रक्ताच्या धारोळ्यात जखमी अवस्थेत पडलेल्या सुनिलला त्वरीत येथील प्राथमिक आऱोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले.

दरम्यान उपचारा पुर्वीच तो मृत्यू पावल्याचे डाॅक्टरांनी सांगीतले. या घटनेनंतर इंदिरानगर येथे मोठ्या संख्येने नागरीक जमा झाले होता. या घटनेचा अधित तपास लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संदिप भोसले करत आहेत.