दाभोलकरांचे खुनी पकडणार केव्हा? जवाब दो, जवाब दो!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

सातारा - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्यांना केव्हा पकडणार, याचा जाब आज ‘अंनिस’सह विविध परिवर्तनवादी संघटनांनी ‘जवाब दो?’ आंदोलनाद्वारे केंद्र व राज्य सरकारला निषेध रॅली, निषेध सभा तसेच सोशल मीडियावर ‘जवाब दो’ आणि व्हू किल्ड दोभालकर, या हॅशटॅगद्वारे विचारला. 

डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी अद्याप सापडत नाहीत, ही मारेकऱ्यांची हुशारी आहे की सरकारची निष्क्रियता, याचा जाब विचारण्यासाठी सकाळी  दहा वाजता शाहू चौकातील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निषेध मोर्चास प्रारंभ झाला. लढेंगे...जितेंगे..., जवाब दो ? जवाब दो ? केंद्र सरकार जवाब दो ? राज्य सरकार जवाब दो ? अशा घोषणा मोर्चेकऱ्यांनी दिल्या. हा मोर्चा रयत शिक्षण संस्था, पोवई नाकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला.

तेथे युवकांनी पथनाट्याच्या माध्यमातून अंधश्रद्धेला बळी पडू नका असा संदेश दिला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी मनोगताद्वारे सरकारचा निषेध  व्यक्त केला. 

‘हॅशटॅग’च्या माध्यमातून विचारला जाब   
आज दिवसभर सोशल मीडियाद्वारे डॉ. दाभोलकरांच्या खुनाच्या तपासाच्या दिरंगाईबद्दल हॅशटॅगच्या माध्यमातून सरकारला जाब विचारला गेला.