‘राष्ट्रवादी’ने घातले सरकारचे श्राद्ध 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

सातारा - आभाळातून पडले गटूळं...भाजपने केले वाटोळे.., नोटाबंदी करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो, अरुण जेटली हाय हाय... अशी घोषणाबाजी करत जिल्हा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आज भवनासमोरच मोदी सरकारने केलेल्या नोटाबंदीच्या वर्षपूर्तीचे श्राद्ध घातले. 

बंद करा बंद करा गरिबीची चेष्टा बंद करा... अशी घोषणाबाजी करत राष्ट्रवादी भवनासमोरच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज सकाळीच नोटाबंदीच्या निषेधार्थ भाजप सरकारचा निषेध केला, तसेच नोटांचे श्राद्ध घातले. या वेळी पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. हजार, पाचशे रुपयांच्या नोटा चिटकवून खाली दहा, वीस आणि शंभर रुपयांच्या नोटा ठेवल्या होत्या. यावेळी श्राद्धाचा विधीही करण्यात आला, तसेच शिरा व भाताच्या नैवेद्याचे वाटप केले. 

या आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, सुधीर धुमाळ, सेवा दलाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र लावंघरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, कार्याध्यक्षा जयश्री पाटील, विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे, पांडुरंग पोतेकर, दत्तात्रेय उत्तेकर, संजय बनकर, मारुती इदाटे, सीमा जाधव, कुसुमताई भोसले, सारिका तपासे, सविता शिंदे, बाळासाहेब शिंदे, संतोष घाडगे, शुभम साळुंखे, स्वप्नील डोंबे, ज्येष्ठ नागरिकचे नावडकर, श्री. धुमाळ, आयटी सेलचे सागर धनवडे, सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष सचिन कुराडे, भटक्‍या विमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष अशोकराव जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: satara news NCP Demonetisation