...त्यावेळी राजकीय भुकंप ठरलेलाच असतो

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

कऱ्हाड (सातारा): माजी केंद्रीय कृषी शरद पवार कृष्णे काठी जेंव्हा जेंव्हा रेठरे बुद्रूकला येतात. त्यावेळी राजकीय भुकंप ठरलेलाच असतो. आजच्या त्यांचा दौराही असाच काही संकेते देवून गेला. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या घरी त्यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या टीम सह दिलेली भेट अनेकांच्या भुवया ताणून जाणारी ठरली.

(व्हिडीओः सचिन शिंदे)

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पाहुणचार व घरगुती स्वागत असा औपचारिक कार्यक्रम अविनाश मोहिते यांना आयोजीत केला होता. यावेळी सांगली व सातारा जिल्ह्यातील राष्ट्रावादीची कोअर टीम त्यांच्या सोबत होती. त्यात विधान परिषद सभापती रामारजे नाईक निंबाळकर, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, जनता उद्योग समुहाचे प्रमुख राजेश पाटील वाठारकर उपस्थीत होते. यावेळी मोहिते कुटूबियांसमवेत श्री. पवार यांनी वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली. यावेळी सर्वच नेत्यांनी न्याहरी केली. त्यानंतर फोटो सेशन झाले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :