कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती

सचिन शिंदे
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

धरणाचा पाणीसाठा १०१ टीएमसी आहे. पाऊस थांबल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. कोयना धरणाची पाणीपातळी २१६०.२ फुट आहे.

कऱ्हाड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दुसऱ्या दिवशीही पावसाने विश्रांती घेतली.

धरणाचा पाणीसाठा १०१ टीएमसी आहे. पाऊस थांबल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. कोयना धरणाची पाणीपातळी २१६०.२ फुट आहे.

चोवीस तासात कोयनानगरला ११ (४००९), नवजाला सात (४७४२) आणि महाबळेश्र्वरला दोन (४००९) मिलीमीटर पावसाची नोंद झाली. धरणात १४ हजार ६१६ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.