कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती

सचिन शिंदे
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

कोयना धरणाची पाणीपातळी २१४८.५ फुट आहे. पाणीसाठा ८६.४८ टीएमसी आहे. चोवीस तासात कोयनानगरला एक (३३८९), नवजाला १८ (३८१२) आणि महाबळेश्र्वरला २ (३२३४) मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

कऱ्हाड : नऊ दिवस पावसाने कोयना धरण पाणलोट क्षेत्रात विश्रांती घेतली आहे. कोयनेला चोवीस तासात केवळ एक मिलीमीटर पाऊस झाला आहे.

कोयना धरणाची पाणीपातळी २१४८.५ फुट आहे. पाणीसाठा ८६.४८ टीएमसी आहे. चोवीस तासात कोयनानगरला एक (३३८९), नवजाला १८ (३८१२) आणि महाबळेश्र्वरला २ (३२३४) मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

धरणात पाच हजार ५३ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. कोयनेला केवळ एक तर महाबळेश्वरला केवळ दोन मिलीमीटर पाऊस झाला आहे. नवजाला मात्र १८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.