साताराः किल्लेमच्छिंद्रगडजवळ तरस मृतावस्थेत आढळले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

कऱ्हा़ड (सातारा): तालुक्यातील शेणोलीपासून जवळच असलेल्या किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथे गड खिंडीजवळ रस्त्याकडेला तरस मृतावस्थेत आढळले. अज्ञात वहानाने रात्री उशिरा त्याला ठोकरल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे.

शेणोलीजवळून तासगावकडे जाणारा राष्ट्रीय मार्ग आहे. त्या रस्त्यालगत गडखिंड परिसरात आज (बुधवार) सकाळी मृत झालेले तरस नागरिकांना आढळले. सकाळी व्यायामास निघालेल्या लोकांनी तरस पाहिले. तरसाच्या अंगावर कुठेही जखमेची खूण अथवा त्यालगत रक्तस्त्राव दिसत नव्हता. तेथून जवळच डोंगर क्षेत्र आहे. त्याचबरोबर सागरेश्वर राष्ट्रीय अभयारण्य क्षेत्राचा परिघही जवळच असल्याने भागात वन्यप्राण्यांचा वावर असतो.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :