श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सातारा जिल्ह्यात २४ ते २८ जून दरम्यान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

२८ जून रोजी सकाळी बरड येथून प्रयाण करुन साधुबुवाचा ओढा येथे सकाळचा विसावा व धर्मपुरी पाटबंधारे बंगला कॅनालजवळ दुपारचे भोजन. त्यानंतर शिंगणापूर फाटा (पानसकरवाडी) येथे दुपारचा विसावा घेतल्यानंतर पालखी नातेपुते जि. सोलापूर येथे मुक्कामी पोहोचेल

सातारा :  श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सातारा जिल्ह्यातून २४ ते २८ जून  या कालावधीत मार्गक्रमण करणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

पालखीचे वेळापत्रक (सातारा जिल्हा) 

२४ जून रोजी लोणंद येथे रात्रीचा मुक्काम. २५ जून रोजी लोणंद येथे सकाळचा विसावा व दुपारचे भोजन करुन चांदोबाचा लिंबकडे प्रयाण व चांदोबाचा लिंब येथे उभे रिंगण आणि रात्री तरडगाव ता. फलटण येथे मुक्काम.  

२६ जून रोजी तरडगाव येथून प्रयाण करुन दत्तमंदिर काळज येथे सकाळचा विसावा. तसेच निंभोरे ओढा येथे दुपारचे भोजन घेऊन वडजल येथे दुपारचा विसावा, फलटणकडे प्रयाण व फलटण विमानतळ येथे रात्रीचा मुक्काम राहील.

२७ जून रोजी फलटण येथून निघून विडणी येथे सकाळचा विसावा घेऊन पिंपरद येथे दुपारचे भोजन होईल. त्यानंतर निंबळक फाटा येथे दुपारचा विसावा घेतल्यानंतर पालखी बरड मुक्कामी पोहचेल. बरड येथे रात्रीचा मुक्काम.

२८ जून रोजी सकाळी बरड येथून प्रयाण करुन साधुबुवाचा ओढा येथे सकाळचा विसावा व धर्मपुरी पाटबंधारे बंगला कॅनालजवळ दुपारचे भोजन. त्यानंतर शिंगणापूर फाटा (पानसकरवाडी) येथे दुपारचा विसावा घेतल्यानंतर पालखी नातेपुते जि. सोलापूर येथे मुक्कामी पोहोचेल.