फलटणला पावसाच्या हजेरीनंतरही तलाव कोरडेच

संदीप कदम
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

फलटण (जि. सातारा) : तालुक्यात सर्वत्र पावसाने समाधानकारक हजेरी लावली असली तरी टंचाईग्रस्त मिरढे (ता. फलटण) परिसरातील तलाव कोरडेच असून, पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी धोमबलकवडीच्या कालव्याचे पाण्याने परिसरातील तलाव भरावे यासाठी प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी मिरढे ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदन देण्यात आले. 

कायम दुष्काळी असलेल्या मिरढे गावपरिसरात सर्वांत कमी पाऊस झाला आहे. परिणामी गावातील एक पाझर तलाव, १५ सिमेंट बंधारांमध्ये पाण्याचा मृत साठा आहे.

गावापर्यंत धोमबलकवडी कालव्याचे काम पुर्णत्वाकडे गेले असून, कायम दुष्काळी असलेल्या या गावास पाणी मिळाल्यास टँकरमुक्त गाव होईल. सध्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून, धोमबलकवडीचे पाणी शिवारात आल्यास पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, असे या निवेदनात म्हटले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :