दरोडेखोरांच्या हल्ल्यात फलटणचे तीन पोलिस जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

पोलिस उपनिरिक्षक श्री. भोळे यांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात दरोडेखोर संज्या रमण्या पवार याच्या डाव्या मांडीवर गोळी बसल्याने तो जखमी झाला आहे. मात्र त्या अवस्थेतही तो व त्याचे नातेवाईक फरार झाले आहेत. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा जमा झाला आहे.

लोणंद : लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झणझणे सासवड (ता.फलटण) येथे वडाचा मळा बेंदवस्ती येथे आज (ता. 30) रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास खून,दरोडा,घरफोड्यातील पोलिसांच्या रेकाॅर्डवर असणारा अट्टल गुन्हेगार संज्या रमण्या पवार याचा पाठलाग करून त्याला पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या फलटण ग्रामीण पोलिसांवर त्याने व त्याच्या अन्य सात ते आठ नातेवाईकांनी तलवार, कोयता व दांडक्याने केलेल्या हल्ल्यात तीन पोलिस जखमी झाले आहेत.

त्यामध्ये पोलीस हवालदार श्री. जगदाळे यांच्या डाव्या बाजूस पाठीवर कोयत्याचा घाव बसल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना फलटण येथे खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अन्य दोन पोलिसही मुक्का मार बसल्याने जखमी झाले आहेत. पोलिसांच्या खाजगी मोटारीचीही दगड व दांडक्याने मोडतोड केली आहे.

पोलिस उपनिरिक्षक श्री. भोळे यांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात दरोडेखोर संज्या रमण्या पवार याच्या डाव्या मांडीवर गोळी बसल्याने तो जखमी झाला आहे. मात्र त्या अवस्थेतही तो व त्याचे नातेवाईक फरार झाले आहेत. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा जमा झाला आहे. लोणंद पोलिस ठाण्यात हा गुन्ह्य नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :