कऱ्हाडः पोलिस निरिक्षक विकास धस न्यायालयात हजर

सचिन शिंदे
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

कऱ्हाड (सातारा): करमाळा येथील संशयीत रावसाहेब जाधव खून प्रकरणातील संशयीत पोलिस निरिक्षक विकास धस आज (गुरुवार) येथील न्यायालयात हजर झाले.

१९ जून २०१६ रोजी रावसाहेब जाधव यांचा पोलिस कोठडीत असताना मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात त्याचा मेव्हणा अनिल डिकोळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा तपास राज्य गुप्तचर विभाग करत आहे.

डिकोळेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्यात पोलिस निरिक्षक धस, सहायक पोलिस निरिक्ष हनुमंत कांकडकी यांच्यासह बारा जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यात टप्प्या टप्प्याने सर्व संशयीत अटक झाले आहेत. त्यात काहीजण जामीनावर बाहेर आहेत. पोलिस निरिक्षक धस यांना अटक नव्हती. त्यांनी जामीनासाठी प्रयत्न केले होते. त्याशिवाय फिर्यादीला आव्हान देणारी याचिकाही दाखल केली होती. त्या प्रकरणात आज तब्बल एक वर्षे वीस दिवसांनी पोलिस निरिक्षक धस फौजदारी न्यायालयात हजर झाले. त्यांना उद्या (शुक्रवार) न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश झाला आहे. उद्या त्यांना राज्य गुप्तचर विभाग ताब्यात घेईल.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :