कऱ्हाड: लायन्स क्लबतर्फे युवक सुरक्षा अभियान

depression
depression

कऱ्हाड :  युवतींसह युवकांमध्ये वाढणारे नैराश्य व त्यातून होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासह युवकांच्या सुरक्षेसाठी व त्यांना समुपदेशन करण्यासाठी पोलिस व कऱ्हाड लायन्स क्लबतर्फे युवक सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे.

कायमस्वरूपी उपक्रम राबवला जाणार आहे. त्या निमित्ताने राज्यातील पहिला प्रयोग येथे साकारतो आहे. विद्यानगरातील महाविद्यालयाच्या आवारात सहा सीसीटिव्ही कॅमेरे त्यासाठी बसवण्यात येणार आहे. त्याशिवाय युवकांच्या मदतीसाठी दोन मोफत हेल्पलाईन बसवण्यात येणार आहेत. रॅंगीग, विद्यार्थ्यांमधील नैराश्यासह युवतींना हर एक प्रकारच्या मदतीसाठी त्या हेल्पलाईन चोवीस तास कार्यरत राहणार आहेत. त्यात लायन्स क्लबने सिंहाचा वाटा उचलला आहे. अलीकडच्या काळात युवक-युवतींच्या आत्महत्या व नैराश्याचा प्रकार वाढला आहे. त्याशिवाय महाविद्यालयाच्या आवारात अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे सातत्याने वातावरण तणावपूर्णही राहते आहे. त्याशिवाय अनके विद्यार्थी नैराश्यात जात आहेत. ती स्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी युवतीसंह युवकांसाठी खास उपक्रम हाती घेण्याचा विचार केला. त्यासाठी पोलिस निरिक्षक प्रदीप जाधव यांनी पुढाकार घेतला. त्यांनी त्यासाठी लायन्स क्लबशी बोलणे केले. त्यांनी त्यांची कल्पना त्यांना समजावून सांगितली. त्यानुसार लायन्स क्लबही त्यांच्या मदतीसाठी तयार झाला आहे. त्यामुळे तो उपक्रम पोलिस व लायन्स क्लब असा संयुक्तपणे राबवणार आहेत. त्यासाठी पोलिसांची त्यांना चोवीस तास मदत राहणार आहे.

विद्यार्थ्यांच्या आत्महत्येसह त्यांच्यात वेगवेगळ्या कारणाने येणारे नैराश्य लक्षात घेवून त्यांच्या समुपदेशनासाठी हेल्पलाईन उभा करण्याचे काम या निमित्ताने होणार आहे. विद्यानगर भागात दहापेक्षा जास्त महाविद्यालये आहेत. त्या भागात दररोज किमान पंचवीस हजार विद्यार्थी शिक्षणाच्या निमित्ताने येतात. त्या भागात अशा उपक्रमाची नितांत गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्या भागातील प्रत्येक रस्त्यावर एक असे सहा सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्या निमितिताने महाविद्यालयाचा सगळा भाग पोलिसांच्या नियंत्रणाखाली राहिल. त्याचा कंट्रोल रूम पोलिस ठाण्यात असेल. ज्या विद्यार्थ्यांना नैराश्य वाटत असेल किंवा अन्य कोणताही त्रास होत असेल त्या विद्यार्थ्यांसाठी चोवीस तास हेल्पलाईनची सुविधा मोफत खुली करून देण्यात येणार आहे. त्या दोन्ही हेल्प लाईनवर दोन वेगवेगळे समुपदेशक असतील, ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. त्याचे दोन मोबाईल देण्यात येणार आहेत. त्यावर दोन्ही तज्ञही स्वतंत्रपणे चोवीस तास विद्यार्थ्यांसाठी वेळ देणार आहेत. लायन्स क्लबने त्यासाठी सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यांनी पोलिसासमवेत काम करण्याचे निश्चीत केले आहे. 

विद्यार्थ्यांमध्ये वाढलेले नैराश्य व त्यांच्यातील न्यूनगंड दूर करण्यासाठी पोलिस व लायन्स क्लबतर्फे युवक सुरक्षा अभियान हाती घेण्यात आले. त्या माध्यामातून त्रास होणाऱ्या युवतीसह युवकांशी थेट संवाद साधून त्यांना त्या कृत्यापासून परावृत्त करण्यात येईल. त्या हेल्पलाईन चोवीस तास सुरू राहणार आहेत. 
- प्रदीप जाधव, पोलिस निरिक्षक, कऱ्हाड शहर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com