विवाहित प्राध्यापिकेची अतीतमध्ये आत्महत्या 

विवाहित प्राध्यापिकेची अतीतमध्ये आत्महत्या 

नागठाणे - अतीत (ता. सातारा) येथील विवाहित प्राध्यापिकेने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना घडली. 

बोरगाव पोलिसांनी सांगितले, की सौ. अर्चना रोहित जाधव (वय 26) असे या प्राध्यापिकेचे नाव आहे. त्या साताऱ्यातील एका शिक्षण संस्थेत कार्यरत होत्या. अतीत येथे सासू, सासरे, पती व मुलीसह त्या राहात होत्या. आज सकाळी त्यांचे पती व सासरे शेतात गेले होते. सासू परगावी गेल्या होत्या. मुलगी बालवाडीत गेली होती. सकाळी साडेनऊच्या सुमारास सासरे हणमंत जाधव घरी आले असता त्यांना अर्चना यांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यांची शोधाशोध केली असता घरातील बेडरूममध्ये छताच्या लोखंडी अँगलला अर्चना यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलिसांना मृतदेहाजवळ चिठ्ठी सापडली असून, त्यातील मजकूर समजू शकला नाही. सासरे हणमंत जाधव यांनी फिर्याद दिली आहे. फौजदार नानासाहेब कदम तपास करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com