कऱ्हाड व पाटण तालुक्यात सकाळपासून पावसाची रिपरीप सुरु

koyna dam
koyna dam

कऱ्हाड (सातारा): कऱ्हाड व पाटण तालुक्यात सकाळपासून पावसाची रिपरीप सुरु होती. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला असून, पिकांसाठी जीवदान देणारा ठरला आहे. तालुक्यात पेरणी झालेल्या पिकांना हा पाऊस उपयुक्त ठरला आहे.

पावसामुळे उर्वरीत पेरण्या उद्यापासुन सुरु होतील अशी चिन्हे आहेत. पाटण तालुक्यातील कोयनानगर, पाटणसह संपुर्ण तालुक्यात आज (मंगळवार) सकाळपासुनच पावसाने दमदार सुरुवात केली. त्यामुळे बळिराजा सुखावला आहे. पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असुन आज अखेर धरणात 47.27 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

पाटण तालुक्याच्या कोयना, मल्हारपेठ, पाटण व तारळे, मारुलहवेली भागात जोरदार पावसास सुरुवात झाल्याने बळिराजा सुखावला आहे. पावसाचे आगार असलेल्या कोकण किनारपट्टीला अजूनही जोरदार पावसाची वाट पहावी लागणार आहे. काही ठिकाणी अजूनही शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आज सकाळपासून सर्वत्र पावसाच्या सरी कोसळत होत्या. परंतु, तालुक्याच्या पश्चिम भागातून आज सकाळ पासूनच दमदार पावसाने आगमन केल्याने बळिराजा सुखावला आहे.

कोयना परिसरात आज दिवसभर पावसाची रिपरीप सुरु होती तर दुपारनंतर पावसाने चांगलाच जोर धरल्याने धरण कोयना धरणाच्या पाणीपातळित झपाट्याने वाढहोत चालली आहे. गतवर्षीपेक्षा कोयना धरणात आजमितीला ४७.२७. टीएमसी इतका साठा झाला असून, पाणिपातळीत वाढ होत चालली आहे. आज कोयना ९० मिलीमीटर, नवजात सर्वाधिक जास्त १०६, महाबळेश्धवर १०३, मिलीमीटर पावसाची नोद झाली.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com