पावसामुळे टळले पाणीकपातीचे संकट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

सातारा - कास तलावात सुमारे पावणेसहा फुटांपर्यंत पाणीपातळी घटल्याने सातारा नगरपालिका प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र, वरुणराजा धावून आला आणि शहरावरील पाणीकपातीचे संकट टळले. गेल्या दोन दिवसांत कास परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसाने तलावातील पाणीपातळी पावणेसहा फुटांवरून दहा फुटांपर्यंत वधारली आहे. 

सातारा - कास तलावात सुमारे पावणेसहा फुटांपर्यंत पाणीपातळी घटल्याने सातारा नगरपालिका प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र, वरुणराजा धावून आला आणि शहरावरील पाणीकपातीचे संकट टळले. गेल्या दोन दिवसांत कास परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसाने तलावातील पाणीपातळी पावणेसहा फुटांवरून दहा फुटांपर्यंत वधारली आहे. 

मॉन्सूनच्या पावसाचे आगमन लांबल्याने कास तलावातील पाणीपातळी कमालीची घटली होती. शनिवारी (ता. २४) तलावात अवघा पावणेसहा फूट पाणीसाठा होता. तलावातील गाळ व मृतसाठा लक्षात घेता दीड फूट पाणी तलावात शिल्लक होते. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्याने पालिकेचे पाणीपुरवठा सभापती सुहास राजेशिर्के यांनी पर्यायी यंत्रणा तयार ठेवली होती. तलावातील पाणी उपसून पाटात सोडण्यासाठी दोन मोटारी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. पाणीपुरवठा विभागाचा एक कर्मचारी दिवसातून तीन वेळा पाणीपातळीवर लक्ष ठेवून त्याबाबतची अद्ययावत माहिती पालिकेत कळवत होता. काटकसरीचा उपाय म्हणून पाणीपुरवठा विभागाने ‘कास’अंतर्गत भागात एक दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन केले होते. 

तथापि, वरुणराजाने काससह सातारा व परिसरात कृपादृष्टी दाखवत दमदार सुरवात केली. कास परिसरात तर गेल्या दोन दिवसांपासून चांगला पाऊस सुरू झाल्याने पालिका प्रशासनासह शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या. कास तलावाच्या परिसरात पडणाऱ्या पाण्याचे पांढरे फेसाळ धबधबे वाहू लागले आहेत. या धबधब्यांच्या पाण्याचे लोट नैसर्गिक उताराने कास तलावाच्या बाजूस वाहत आहेत. दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे सोमवारी सकाळी तलावात दहा फुटांपर्यंत पाणीपातळी वाढली  असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.

सातारकरांना धन्यवाद : सुहास राजेशिर्के 
कास परिसरात शनिवारी रात्रीपासून चांगला पाऊस सुरू झाला आहे. तलावाचे पाणलोट क्षेत्र मोठे व कातळ दगडाचे असल्याने तलावातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास आठवडाभरात तलाव भरून सांडवण्यावरून पाणी वाहण्यास वेळ लागणार नाही. टंचाई काळात काटकसरीच्या उपाययोजनांना सातारकरांची साथ मिळाल्यामुळे उन्हाळी हंगाम विनासायास गेला. यापुढील काळातही नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन पालिकेचे पाणीपुरवठा सभापती सुहास राजेशिर्के यांनी ‘सकाळ’शी बोलताना केले. 

पश्चिम महाराष्ट्र

पंढरपूर - कोपर्डी खटल्यातील आरोपींना येत्या तीन महिन्यांत फाशीची शिक्षा जाहीर न झाल्यास आपण स्वतः रस्त्यावर उतरून...

02.30 AM

बिजवडी  - माण तालुका शेतकरी सहकारी खरेदी- विक्री संघाच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक पुढील आठवड्यात (ता. 24) होत...

02.30 AM

सोलापूर - सोलापूर परिसरातील विविध महाविद्यालयांत नटसम्राट नाटकाचे एकपात्री प्रयोग फुलचंद नागटिळक करीत आहेत. नुकताच त्यांनी...

02.21 AM