कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

सचिन शिंदे
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

चोवीस तासात कोयनेला ३५ व  नवजाला ४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पडत होत्या. पायथा वीज गृहातुन सोडण्यात येणारे पाणी काल सकाळी बंद केले आहे.

कऱ्हाड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात पुन्हा पावसाचा जोर वाढला.

दोन दिवस पडत असलेल्या पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र चोवीस तासात कोयनेला ३५ व  नवजाला ४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पडत होत्या. पायथा वीज गृहातुन सोडण्यात येणारे पाणी काल सकाळी बंद केले आहे.

कोयना धरणाची पाणीपातळी २१५१.०९ फुट आहे. धरणातील पाणीसाठा ९०.१४ टीएमसी झाला आहे. चोवीस तासात कोयनानगरला ३५ (३६००), नवजाला ४६ (४१४४), महाबळेश्वरला  ९ (३५१३) मिलीमीटर पावसाची नोंद झाली. धरणात सहा हजार ७३८ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :