दिल्लीचे तख्त हालवून दाखवू - राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

सातारा - आम्हाला केवळ शेतकऱ्यांचे प्रश्‍न दिसत आहेत. सदाभाऊंचा विषय आमच्यासाठी संपला आहे. आमची चळवळ व्यक्तिसापेक्ष नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी ती एकत्रित केलेली आहे. राजू शेट्टीदेखील उद्या वाट सोडून गेला, तरीही चळवळ पुढे जाईल, असे खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दिल्लीचे तख्त हालवण्याची ताकद शेतकऱ्यांत आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

येथे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मेळावा झाला. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलले. ‘मला पक्षातून हाकलून दिले’, असे मंत्री सदाभाऊ खोत सांगत आहेत, याविषयी शेट्टी म्हणाले, ‘‘जोपर्यंत शेतकरी माझ्यासोबत आहेत. तोपर्यंत मी चिंता कशासाठी करू? आजपर्यंत अनेक आव्हाने मी पेलली आहेत. ’’

मेधा खोलेंचा निषेध करून ते म्हणाले, ‘‘डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गीनंतर गौरी लंकेश यांची हत्या झाली. अशा प्रकारचा वैचारिक दहशतवाद फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आम्ही चालू देणार नाही. प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन हातात घेऊ.’’

तालिबानी पद्धतीने वैचारिक दहशतवाद पसरविण्याचे काम सुरू आहे. अशा प्रकारचा वैचारिक दहशतवाद फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आम्ही चालू देणार नाही. प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू.
- राजू शेट्टी, खासदार