'रयत'च्या जनरल बॅाडी सदस्यपदी हाजी शौकत तांबोळी यांची निवड

युनूस तांबोळी
शुक्रवार, 28 जुलै 2017

साताराः रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॅाडी सदस्यपदी मुस्लीम बॅकवर्ड क्लासेस ऑग्रनायझेस, इंडीयाचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शौकत तांबोळी यांची निवड करण्यात आली. सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच पत्रकार परीषद घेऊन त्यांच्या निवडीची घोषणा केली.

साताराः रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॅाडी सदस्यपदी मुस्लीम बॅकवर्ड क्लासेस ऑग्रनायझेस, इंडीयाचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शौकत तांबोळी यांची निवड करण्यात आली. सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच पत्रकार परीषद घेऊन त्यांच्या निवडीची घोषणा केली.

अहमदनगर जिल्ह्यातील हाजी शौकत तांबोळी यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले आहे. व्यवसायाबरोबर सामाजीक, शैक्षणीक, शेती, सांस्कृतीक अशा विविध क्षेत्रात त्यांचा नावलौकीक आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात रयत शिक्षण संस्थेचे शैक्षणीक कार्य विस्तारलेले आहे. या संस्थेत साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून, साडे सोळा हजार शिक्षक व कर्मचारी आहेत. 42 कॅालेज, 438 माध्यमिक शाळा, 7 व्यवसाय कौशल्य कॅालेज, 51 प्राथमिक शाळा, 19 इंग्रजी शाळा, 90 वसतीगृह, 8 आश्रमशाळा या सात विभागीय कार्यालया मार्फत काम करतात. अशा संस्थेवर काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. संस्थेचे अध्यक्ष पवार यांच्या बरोबर अहमदनगर जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनिय काम केल्यामुळेच त्यांची निवड झाल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या या निवडीमुळे मुस्लीम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध होऊ शकणार आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मुस्लीम बॅकवर्ड क्लासेस ऑग्रनायझेस, इंडीया पुणेचे अध्यक्ष बादशहा इनामदार यांनी निवडीबद्दल अभीनंदन केले आहे.

तांबोळी म्हणाले, 'रयत शिक्षण संस्था ही गोरगरीब जनतेच्या कल्याणकारी शिक्षणासाठी पुढे आलेली संस्था आहे. कमवा आणी शिका या योजनेतून विद्यार्थ्यांना तांत्रीक कौशल्य देऊन समाजात यशस्वी वाटचाल करण्यास शिकवले जाते. भविष्यात स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात चमकण्याची संधी निर्माण करण्यात येईल. यासाठी संपुर्ण राज्याचा दौरा करून शाळेच्या भौतीक सुवीधा सोडविण्याचे काम करण्यात येईल.'

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्यांसाठी क्लिक करा :

जेफ बेझोस ठरले जगात सर्वांत श्रीमंत 
कर्जमाफी की कर्जवसुली?
पंतप्रधान पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांनाच अधिक धनलाभ 
स्वार्थी नितीश कुमार यांनी दगा दिला- राहुल गांधी 
टोमॅटो विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट 
पुनर्गठित कर्जदारांनाही माफी - मुख्यमंत्री
लालूप्रसाद, राहुल यांना योग्य वेळी उत्तर देऊ: नितीशकुमार
राज्यातील 82 पेट्रोल पंपांत मापात पाप 
परराष्ट्रमंत्र्यांना खोटे ठरविण्याचा काँग्रेसचा अजेंडा: सुषमा स्वराज
मुजोर बॅंक अधिकाऱ्यांना धडा शिकवा - सुनील तटकरे 
काँग्रेसचे तीन आमदार भाजपच्या कळपात
महिला तस्करी रोखावीच लागेल - मुख्यमंत्री