नवीन परीक्षा पद्धतीबाबत साताऱ्यात शनिवारी चर्चासत्र

नवीन परीक्षा पद्धतीबाबत साताऱ्यात शनिवारी चर्चासत्र

सातारा - ‘सकाळ विद्या’ व ‘क्रिएटिव्ह ॲकॅडमी’च्या वतीने सातवी ते नववीत शिकणाऱ्या, तसेच दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी विनामूल्य चर्चासत्र आयोजित केले आहे. शनिवार (ता. १४) सकाळी साडेदहा वाजता साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेज सभागृहात हे चर्चासत्र होणार आहे. 

दहावीचा अभ्यास व गुण मुलांच्या भावी करिअरची दिशा ठरवत असतात. पुढील वर्षापासून बोर्डाच्या परीक्षांचा पॅटर्न व अभ्यासक्रमामध्ये बदल होत आहे. त्याविषयी पालक व मुलांमध्ये संभ्रम आहे. या विशेष चर्चासत्रात पुढील वर्षीचा (२०१९) दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षांचा पॅटर्न, बदललेला अभ्यासक्रम, नवीन शैक्षणिक धोरण याविषयी सखोल माहिती पालक व विद्यार्थ्यांना मिळेल. दहावीनंतर कला, शास्त्र, वाणिज्य शाखांची निवड कशी करावी, अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या आयआयटी-जेईई, नीट, सीईटी अशा प्रवेश परीक्षा, त्यांचा अभ्यासक्रम व बदललेले स्वरूप त्याचबरोबर जेईई व सीईटीचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीतील नेमका फरक काय आहे, यांविषयी विद्यार्थ्यांच्या मनात शंका असते. या शंकांचे निरसन या चर्चासत्रातून होणार आहे. सातवीपासूनच या परीक्षांची तयारी, दहावीनंतर उपलब्ध असणारे करिअरचे पर्याय, संधी, नेमक्‍या पर्यायाची निवड, बारावीनंतर अभियांत्रिकी व मूलभूत विज्ञान शाखेतील करिअरचे विविध पर्याय आणि त्यातील शिक्षण घेण्यासाठी आयआयटी, एनआयटी, बीट्‌स, व्हीआयटी, आयआयएससी, आयसर, नायसर यांसारख्या देशभरातील नामांकित शिक्षण संस्था व त्यांच्या प्रवेश प्रक्रिया याबाबत प्रा. एन. ए. शेख मार्गदर्शन करणार आहेत. 

कधी - शनिवार, १४ एप्रिल 
केव्हा - सकाळी १०.३० वाजता 
कोठे - यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेज सभागृह, सातारा
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : ९९२२९१३३४५
विद्यार्थी व पालकांसाठी प्रवेश विनामूल्य 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com