'साविआ'च्या कारभाराविरोधात बोंबाबोंब

सातारा : विरोधी नगर विकास आघाडीने चक्री उपोषणातील भाग म्हणून बुधवारी पालिकेतील विविध विभागांमध्ये बोंबाबोंब आंदोलन केले. मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर बोंबाबोंब आंदोलनात सहभागी झालेले नगरविकास आघाडीचे सदस्य.
सातारा : विरोधी नगर विकास आघाडीने चक्री उपोषणातील भाग म्हणून बुधवारी पालिकेतील विविध विभागांमध्ये बोंबाबोंब आंदोलन केले. मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर बोंबाबोंब आंदोलनात सहभागी झालेले नगरविकास आघाडीचे सदस्य.

नगराध्यक्षा, सीओंसह विषय समित्या दालनांपूढे "नविआ'चे आंदोलन

साताराः नगराध्यक्षा व सत्तारूढ सातारा विकास आघाडीच्या कारभाराविरोधात नगरविकास आघाडीने आज (बुधवार) पालिकेत बोंबाबोंब आंदोलन केले. नगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांच्यासह विविध विषय समित्यांच्या दालनापूढे नगरविकास आघाडीच्या सदस्यांनी बोंब मारुन कारभाराचा निषेध नोंदविला.

डॉ. नरेंद्र दाभोलकर सामाजिक स्मृती पुरस्कार, शहरातील विविध अंतर्गत रस्त्यांचे पॅचिंग, बंद असलेल्या स्ट्रीट लाइट, अभयसिंहराजे स्मृती उद्यानाची दुरवस्था, विरोधी नगरसेवकांची कामे अडवणे, वॉर्ड फंड खर्ची टाकण्यासाठी मान्यता न देणे या व अन्य मागण्यांची सत्तारुढ आघाडीने पुर्तता न केल्याने विरोधी नगरविकास आघाडीने मंगळवारपासून (ता. 20) पालिकेच्या प्रवेशदारात चक्री उपोषण सुरू केले. आज या आंदोलनाचा दूसरा दिवस होता. दुपारी साडे बारा वाजता नगरविकास आघाडीच्या आजी- माजी सदस्यांनी पालिकेतील विविध विभागांत जाऊन कारभाराचा बोंब मारुन निषेध व्यक्त केला. कारभार सुधारा अन्यथा खूर्च्या खाली करा अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्या दालनापूढे ही बोंब मारली. विविध कामांसाठी आलेले नागरीक उत्सुकतेने हे आंदोलन पाहत होते.

या आंदोलनात "नविआ'चे पक्ष प्रतोद अमोल मोहिते, नगरसेवक अशोक मोने, शकील बागवान, शेखर मोरे- पाटील, नगरसेविका लीना गोरे, सोनाली नलावडे, मनीषा काळोखे, दीपलक्ष्मी नाईक, माजी उपाध्यक्ष जयेंद्र चव्हाण, अविनाश कदम, माजी नगरसेवक सचिन सारस यांच्यासह शरद गायकवाड, राजू गोरे, रवी माने, रवी पवार आदी सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com