उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे समर्थकांचे अटकसत्र सुरुच

प्रवीण जाधव
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

सातारा : सुरूचीवर झालेल्या धुमश्‍चक्रीप्रकरणी माजी स्विकृत नगरसेवक व पालीका कर्मचाऱ्यासह दोन्ही गटाच्या एकूण पाच जणांना शाहुपूरी पोलिसांनी आज (सोमवार)अटक केली. त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

उदयनराजे समर्थक स्विकृत नगरसेवक शशांक उर्फ बाळासाहेब प्रभाकर ढेकणे (वय 43, रा. करंजे), इम्तीयाज बाळासाहेब बागवान, शिवेंद्रसिंहराजे समर्थक पालीकेचा आरोग्य कर्मचारी उत्तम यशवंत कोळी (वय 22, रा. रासपूरा पेठ), निखील संजय वाडकर (वय 21, रा. करंजे पेठ) व अनिकेत अशोक तपासे (रा. मल्हार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

कोजागीरीच्या रात्री साताऱ्यात दोन्ही राजांच्या गटात झालेल्या राड्या प्रकरणी पोलिसांनी अटक सत्राची मोहिम तिव्र केली आहे. काल पर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली होती. सध्या सर्वजण पोलिस कोठडीत आहेत. सीसीटीव्ही फुटेज व रेकॉर्डींगच्या आधारे पोलिसांनी अटकेचे सत्र कालपासून तिव्र केले आहे. आज आणखी पाच जणांना अटक करण्यात आली. दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :