उदयनराजेंशी मतभेद; पण मनभेद नाहीत - शशिकांत शिंदे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

सातारा - खासदार उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. त्यांच्यात आणि आमच्यात काही कारणांनी मतभेद असतील; पण मनभेद नाहीत, असे स्पष्टीकरण आमदार शशिकांत शिंदे यांनी आज केले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्याबाबतीत पक्षाचे अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

येथे राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलले. उदयनराजेंबाबत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांत नाराजी आहे. ही नाराजी वाढदिवसाच्या कार्यक्रमातून दिसून आली. 

राजधानी महोत्सवाचे तुम्हाला निमंत्रण होते का, या प्रश्‍नावर श्री. शिंदे म्हणाले, ""राजधानी महोत्सवाचे निमंत्रण होते. त्यांनी वैयक्तिक मोबाईलवरून संपर्कही केला होता; पण आम्ही काही कारणास्तव त्यांच्या कार्यक्रमाला जाऊ शकलो नाही.'' पक्षाचे अध्यक्ष शरद पवारही या महोत्सवाला नव्हते, असे विचारले असता ते म्हणाले, ""राजधानी महोत्सव हा त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. प्रत्येक कार्यक्रमाला पवार साहेब उपस्थित राहतीलच असे नाही. उदयनराजे आजही राष्ट्रवादीतच आहेत. ते आमचे खासदार आहेत.'' 

एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपतील नेतेमंडळी एकत्र आली किंवा उपस्थिती दाखविली म्हणजे उदयनराजेंनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला, असे होत नाही. त्यामुळे त्यांच्याबाबतीत पक्षाचे अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. 
- आमदार शशिकांत शिंदे 

Web Title: satara news shashikant shinde udayanraje bhosale