शिवसेना घेणार कर्जमाफीचा आढावा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

सातारा - शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार कर्जमाफीबाबत बॅंका व शासकीय पातळीवर नेमकी काय कार्यवाही झाली? याची माहिती घेण्याचे काम शिवसेनेचे पदाधिकारी करणार आहेत. येत्या मंगळवारी (ता. २२) जिल्हा बॅंक, राष्ट्रीयीकृत बॅंकेत, तर बुधवारी (ता. २३) जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जाऊन कर्जमाफीसंदर्भात प्रत्यक्ष कार्यवाहीची लेखी माहिती घेणार आहेत.

मुंबईत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पक्षसंघटना वाढीसाठी गावागावांत बुथ प्रमुखांच्या नियुक्तीवर भर द्यावा, तसेच कर्जमाफीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची माहिती पदाधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी सूचना केली होती. मंत्री काम करत नाहीत म्हणून पदाधिकाऱ्यांनीही कामे करायची नाहीत, हे चालणार नाही. पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न आणि कामांना प्राधान्य द्यावे, अशी सूचना केली होती. त्यानुसार येत्या मंगळवारी (ता. २२) शिवसेनेचे पदाधिकारी जिल्हा मध्यवर्ती बॅंक तसेच राष्ट्रीयीकृत बॅंकेत जाऊन तेथे कर्जमाफीबाबत नेमकी कोणती कार्यवाही झाली, याची लेखी माहिती घेणार आहेत. तसेच बुधवारी (ता. २३) जिल्हा उपनिबंधक कार्यालयास भेट देऊन शिवसेनेचे पदाधिकारी कर्जमाफीसंदर्भात प्रत्यक्ष कार्यवाहीची लेखी माहिती घेतील. दरम्यान, सप्टेंबरमध्ये पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली व कोल्हापूर या तीन जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. त्यामध्ये विशेष करून कर्जमाफीबाबत थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. नऊ व दहा सप्टेंबरला दोन दिवस श्री. ठाकरे दौरा करणार आहेत. त्यामध्ये दहा सप्टेंबरला साताऱ्याच्या धावत्या दौऱ्यात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन गाठीभेटी व कार्यकर्त्यांचा मेळावा होण्याची शक्‍यता आहे.

गजानन कीर्तिकर संपर्क नेते
पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली व कोल्हापूर या तीन जिल्ह्यांचे संपर्क नेते म्हणून खासदार गजानन कीर्तिकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे या तीन जिल्ह्यांत संघटन वाढविणे आणि विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी 
श्री. कीर्तिकर भर देणार आहेत.

Web Title: satara news shiv sena loan