वातावरण बदलांमुळे साथीचे आजार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

सातारा - कडक ऊन, मध्येच ढगाळ स्थिती, हलकासा पाऊस अशा वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार वाढले आहेत. थंडी, ताप, खोकला, थकव्याने रुग्णही बेजार झाले असल्याने जिल्ह्यातील दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. 

ऑक्‍टोबरमधील कडक ऊन, ढगाळ वातावरण, काही ठिकाणी होणाऱ्या पावसामुळे कधी उष्णता, तर कधी हवेतील गारवा असे वातावरण निर्माण होत आहे. परिणामी थंडी, ताप, खोकला आदी आजार वाढू लागले आहेत.

दवाखान्यात जाण्याऐवजी आजार अंगावर काढणे, योग्य ती काळजी न घेणे, पोषक आहार नसणे, वेळीच योग्य ती दक्षता न घेणे यामुळे आजाराचे प्रमाण गंभीर होत आहे. सातारा शहरासह जिल्हाभरातील दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत आहे. पावसाळ्यात मच्छरांमुळे डेंगीची लागणही काही ठिकाणी झाली आहे. खेड हद्दीतील वाढेफाटा येथे ही लागण नियंत्रणात राहावी म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांनी औषध फवारणीही केली. पण, शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. त्यामुळेही साथरोग फैलावण्याचा धोका वाढला आहे. पालिकेने हा कचरा वेळच्या वेळी उचलावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

धुरळ्याचा वाढला त्रास 
साताऱ्यात आता पावसाने उघडीप दिली आहे. शिवाय उन्हाची तीव्रताही वाढली आहे. परिणामी धुरळा उडण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यांवरून मोठी वाहने गेल्यास त्यातून हवेत धुरळा पसरत असल्याने त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला तसेच श्‍वसनाच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे.