अंतराचे कारण देत एसटीची "पाकीटमारी' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

सातारा - येथील पोवई नाक्‍यावरील ग्रेड सेपरेटरच्या कामाने वाहतुकीत आलेल्या व्यत्ययाचा फायदा राज्य परिवहन महामंडळाने घेतला. कऱ्हाड, सांगली, कोल्हापूरहून येणाऱ्या प्रवाशांना सहा रुपयांचा भुर्दड लादला आहे. याचा सर्वांत जास्त फटका विद्यार्थ्यांना बसला असून, विद्यार्थ्यांच्या मासिक पासामध्ये 120 रुपयांची वाढ केली आहे. सर्व्हिस पासमध्ये 240 रुपयांची वाढ झाली आहे. आता रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत किमान दोन ते तीन वर्षे हा भुर्दड पालकांवर पडणार आहे. याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा काही विद्यार्थ्यांनी दिला आहे. 

साताऱ्यात पोवई नाक्‍यावर रस्त्याच्या कामामुळे साताऱ्यात कोल्हापूर बाजूकडून येणारी वाहने शिवराज पेट्रोल पंपाऐवजी वाढे फाट्यावरून बस स्थानकात येत आहेत. त्यामुळे एसटी प्रशासनाने सहा रुपये आकार वाढविला आहे. त्याचा भुर्दंड विद्यार्थ्यांना बसत आहे. उंब्रजहून साताऱ्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पासचे शुल्क 760 वरून 840 रुपये केले आहे. आता हा 120 रुपयांचा भुर्दंड प्रत्येक महिन्याला त्यांना सोसावा लागेल. त्याशिवाय पोवई नाक्‍यावरील हे काम (वेळेत झाले तर) दोन वर्षे चालणार आहे. 

साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेज, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, आझाद कॉलेज व पोवई नाका परिसरातील शाळा, महाविद्यालयांना येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिवराज पंप, अंजठा स्टॉप किंवा बॉम्बे रेस्टारंट येथे महामार्गावर उतरावे लागते. तेथून त्यांना रिक्षाने जावे लागते किंवा पायपीट करावी लागते. वास्तविक विद्यार्थी वाढे फाट्यावरुन स्टॅंडवर जाणारच नसतील तर त्यांना वाढे फाटा मार्गासाठी वाढविलेल्या तिकीट दराचा भुर्दंड एसटी कशासाठी देत आहे, अशी चर्चा विद्यार्थी व पालकांत आहे. 

एसटीच्या भाडेवाढीचीच चर्चा 
अनेक चालक महामार्गावरूनच बस नेत असल्याने साताऱ्यात फॉरेस्ट कॉलनी, गोडोली, जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या प्रवाशांना पायपीट करावी लागत आहे. जादा तिकिटाचा भुर्दंड सहन करून पायपिटीचाही त्रास सहन करावा लागत असल्याने संतापाची भावना निर्माण झाली आहे. साताऱ्यातील फॉरेस्ट कॉलनी, संभाजीनगर, विलासपूर, कोडोली, औद्योगिक वसाहतीकडे जाणारे प्रवासी कऱ्हाड, कोल्हापूरकडून येताना शिवराज पेट्रोल पंप, अंजठा स्टॉप, बॉंबे रस्टॉरंट येथे उतरतात. वाढे फाट्यावरून ते स्टॅंडवर जातच नाहीत. मात्र, त्यांनाही या वाढलेल्या तिकिटाचा फटका विनाकारण सहन करावा लागत आहे.

Web Title: satara news ST bus increase bus ticket due to Road work at Powai Naka in Satara