गौरींभोवती पदार्थ मांडण्यासाठी स्टॅंड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

म्हसवे येथील बर्वे दांपत्याची संकल्पना; आकर्षक आकारात उपलब्ध

सातारा - गौराई पूजा, आराधनेत कोणतीही कमी राहू नये म्हणून तिच्याभोवती सुगरणपणा पणाला लावून केलेले विविध पदार्थ व फळे आकर्षक पद्धतीने मांडता यावीत, यासाठी महिलांच्याच कल्पनेला वाव देत म्हसवे येथील बर्वे दांपत्याने सुंदर स्टॅंड बाजारात विक्रीसाठी आणली आहेत. 

गौरीचे आगमन होताना महिला तिची मोठी हौस करतात. विविध दागिन्यांनी तिला सजवितानाच गौरीच्या नैवेद्यासाठी विविध प्रकारचे फराळ तयार करतात. आपल्या ऐपतीप्रमाणे लाडू- चिवड्यापासून ते करंजा, चकल्या, बर्फी असे विविध प्रकारचे पदार्थ महिला तयार करतात. गौराईच्या सजावटीला फराळाच्या पदार्थांची आकर्षक मांडणीही शोभा देऊन जाते. मात्र, त्यासाठी महिलांना घरातील डबे, फळ्या मांडून त्यावर पदार्थांच्या प्लेट, ताटे ठेवावी लागतात. त्यामुळे जागा जास्त लागते. या परिस्थितीचा विचार करून म्हसवे (सातारा) येथील धनंजय बर्वे व रूपाली बर्वे यांनी सुटसुटीत आणि मजबूत स्टॅंड तयार केली आहेत. 

म्हसवे येथील श्री. बर्वे हे मूळचे नाशिक भागातील. तसे ते हरहुन्नरी. विविध प्रकारच्या कला ते जपून आहेत. म्हसवे येथे ते फॅब्रिकेशनचे काम करतात. त्यात त्यांना पत्नीचीही साथ असते. रूपाली यांनी महिलांची गौरी सजावटीची गरज लक्षात घेऊन श्री. बर्वे यांच्यापुढे स्टॅण्डची कल्पना मांडली.

त्याप्रमाणे लोखंडाच्या साध्या सळ्यांना वेल्डिंगने जोडून त्याला आकर्षक आकार दिले आहेत. सळ्यांना आकार देण्यासाठीचे यंत्र त्यांनी स्वतः तयार केले आहे. कमळ, बदाम, कोयरी, विविध फुलांचे आकार, वर्तुळाकार, अर्धवर्तुळ असे आकार या स्टॅंडला दिले आहेत. त्यावर फराळाच्या प्लेट ठेवण्यासाठी गोल कडी जोडली आहेत. त्यामुळे त्यावर प्लेट व्यवस्थित बसतात. या सर्व कामात पत्नी रूपाली याही त्यांना मदत करतात. महिलांच्या पसंतीस ही स्टॅंड उतरली आहेत.

टॅग्स