पे अँड पार्कला ‘स्थायी’ची मान्यता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

सातारा - राजवाडा बस स्थानकासमोर अभयसिंहराजे संकुल व भवानी पेठ मंडईच्या बेसमेंटमध्ये ‘पे अँड पार्क’ला स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिल्याने राजवाडा परिसरातील दुचाकींच्या पार्किंगचा प्रश्‍न सुटण्यात मदत होणार आहे. ‘सकाळ’ने याबाबत ता. २७ जुलैच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते.

राजवाडा- मोती चौक परिसर शहराची मुख्य बाजारपेठ समजली जाते. या परिसरात सार्वजनिक पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. दुसऱ्या बाजूस नगरवाचनालयासमोर, अभयसिंहराजे भोसले संकुलाच्या बेसमेंटमध्ये पार्किंगच्या जागेचा इतर कारणांसाठी वापर होता आहे. तेथूनच जवळच असलेल्या भवानी पेठ मंडईतच्या बेसमेंटचीही हीच अवस्था आहे. या परिस्थितीत बदल व्हावा, सार्वजनिक वापराच्या इमारतींची योग्य निगा राखली जावी, नागरिकांचीही पार्किंगची सोय व्हावी या उद्देशाने ‘सकाळ’ने पार्किंग विकासासाठी दोन पर्याय सुचविले होते.

‘पे अँड पार्क’ केल्यामुळे या पार्किंगमधील वाहनांच्या सुरक्षिततेची हमी मिळणार आहे. त्याशिवाय पार्किंग क्षेत्राची पुरेशी स्वच्छता राखली जाणार आहे, तसेच पालिकेच्या उत्पन्नातही भर पडणार आहे. पालिका प्रशासनाने या सूचनेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून स्थायी समितीपुढे प्रस्ताव ठेवला होता. याबाबतच्या ठरावाला नुकतीच मान्यता मिळाली असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.