इंग्रजी शाळांना ९०५ विद्यार्थ्यांचा रामराम!

विशाल पाटील
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

सातारा - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी आता पुन्हा फिनिक्‍स भरारी घ्यायला सुरवात केली आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे तीव्र संकट पुढे असतानाही त्याला पुरून उरतील, अशा शाळा जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने साकारल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांतील शाळांमधील ९०५ विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत यावर्षी प्रवेश घेतला आहे. 

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत संकलित मूल्यमापनाच्या प्रथम व द्वितीय चाचणीमध्ये सातारा जिल्ह्याने अनुक्रमे द्वितीय व प्रथम क्रमांक पटकावला. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातही सातारा जिल्ह्यातील शाळांचा समावेश राहिला. शिष्यवृत्ती परीक्षा, क्रीडा प्रबोधिनी, शाळा सिद्धी उपक्रमातही प्रभावी कामगिरी सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने केली आहे, तसेच शाळा ‘आयएसओ’ करण्यातही बाजी मारली आहे. अनेक शाळांनी तर गुणवत्तेत कमाल करत जवळच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांपुढेच आव्हान उभे केले आहे. लोकसहभागातून निधी एकत्रित करून त्याद्वारे शाळांची भौतिक स्थितीही सुधारली आहे. अनेक शाळांमध्ये सेमी इंग्रजी, रात्र अभ्यासिका यासारखे प्रकल्प सुरू केले जात आहेत. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी, शिक्षकही त्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

त्याचा परिपाक म्हणून आता इंग्रजी, खासगी माध्यमांच्या शाळांमधूनही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढत आहे. खटावमध्ये सर्वाधिक १७०, कऱ्हाडमध्ये १६८, तर सातारा तालुक्‍यातील १४८ विद्यार्थ्यांनी इंग्रजी शाळांना रामराम ठोकत जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतल्याची माहिती पटसंख्या निश्‍चितीकरणात पुढे आली आहे. 

अशी आहे पटसंख्या
जिल्हा परिषदेच्या तालुकानिहाय शाळा कसांत पटसंख्या : जावळी २०५ (७०१५), कऱ्हाड ३०७ (२३१२६), खंडाळा ११८ (८५८१), खटाव २४८ (१३९९२), कोरेगाव १८७ (११७८), महाबळेश्‍वर १२१ (२८७५), माण २६९ (१३८९२), पाटण ५३२ (१७९७१), फलटण ३०३ (१९३२०), सातारा २५७ (१५५७३), वाई १६९ (८६२७). एकूण शाळा २७१६, एकूण विद्यार्थी संख्या १,४२,७५०. (माहिती स्तोत्र : जिल्हा परिषद, सातारा)

Web Title: satara news student english medium school