‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ची ‘समर यूथ समिट’ उद्यापासून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

सातारा - करिअरचे असंख्य पर्याय उपलब्ध होत असताना, यशाच्या वाटा शोधणाऱ्या तरुणांसाठी विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) व्यासपीठाने आणली आहे. युवकांसाठी ‘यिन’ करत असलेल्या उपक्रमांचा भाग म्हणून होणाऱ्या तीन दिवसांच्या ‘यिन समर यूथ समिट २०१७’ मध्ये उद्योग, राजकारण, डिजिटल ऑनलाइन मार्केटिंग, टीम बिल्डिंग, शेअर मार्केट, स्टार्टअप, खेळ, नवीन तंत्रज्ञान आदी विषयांवर चर्चा होणार आहे.

सातारा - करिअरचे असंख्य पर्याय उपलब्ध होत असताना, यशाच्या वाटा शोधणाऱ्या तरुणांसाठी विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) व्यासपीठाने आणली आहे. युवकांसाठी ‘यिन’ करत असलेल्या उपक्रमांचा भाग म्हणून होणाऱ्या तीन दिवसांच्या ‘यिन समर यूथ समिट २०१७’ मध्ये उद्योग, राजकारण, डिजिटल ऑनलाइन मार्केटिंग, टीम बिल्डिंग, शेअर मार्केट, स्टार्टअप, खेळ, नवीन तंत्रज्ञान आदी विषयांवर चर्चा होणार आहे.

साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या कर्मवीर सभागृहात होणाऱ्या ‘समिट’चे उद्‌घाटन गुरुवारी (ता. १) सकाळी दहा वाजता होणार आहे. रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, यशवंतराव चव्हाण कॉलेजचे प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम उद्‌घाटनाच्या सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. तीन दिवसांत होणाऱ्या विविध सत्रांमध्ये सुजय खांडगे, निलया ग्रुपचे संस्थापक निलय मेहता, संगणकतज्ज्ञ दीपक शिकारपूर, डॉ. राम गुडगिला, स्पेक्‍ट्रम ॲकॅडमीचे सुनील पाटील, र्स्टार्टअप तज्ज्ञ अल्बर्टो आयोरे, संजय चोरडिया आदी नामवंत सहभागी होणार आहेत. पदवीचे शिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील तरुणांना उन्हाळ्याच्या सुटीचा सदुपयोग करत शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकासावर लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी ‘समर यूथ समिट’ मोलाची भूमिका बजावणार आहे. गेली दोन वर्षे ‘यिन’ ही शिबिरे आयोजित करीत आहे. शिबिर सलग तीन दिवस सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत तीन सत्रांत होईल. या समीटचे मुख्य प्रायोजक स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी, नीलया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणे हे आहेत. फीड इन्फोटेक, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणे यांच्या सहकार्यने हे समीट होणार आहे. स्थानिक पातळीवर कृषिगंगा क्‍लासेस, थोरात व्हॉल्व्हस आणि हॉटेल लेक व्ह्यू यांनी प्रयोजकत्व स्वीकारले आहे.

नोंदणीसाठी संपर्क
समिटमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी बुधवारी (ता. ३१) सायंकाळी सहा वाजेपर्यंत ‘सकाळ’च्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधावा. या समिटसाठी ‘यिन’ सदस्यांसाठी प्रत्येकी रुपये १०० रुपये, तर सदस्येतरांसाठी प्रत्येकी रुपये ३०० शुल्क आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची भोजन व्यवस्था केली जाणार आहे. आवश्‍यकतेप्रमाणे बाहेरगावच्या सदस्यांची निवासाची व्यवस्थाही केली जाईल. तसेच, सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. मर्यादित जागा असल्याने ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर नोंदणी केली जाईल.

पश्चिम महाराष्ट्र

सातारा - समन्वयाचा अभाव असलेली सातारा विकास आघाडी, सातत्य राखण्यात कमी पडलेली नगर विकास आघाडी, प्रत्येकाचा सवतासुभा असलेली...

03.30 AM

सोलापूर - सोलापूर महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून कर वसुलीसाठी कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी (ता. 19)...

03.21 AM

शिराळा - चांदोली राष्ट्रीय उद्यानामुळे शिराळाचे नाव देशपातळीवर झळकत असले तरी येथील पर्यटनाला हवी तेवढी चालना मिळाली नसल्याने...

03.09 AM