जिल्ह्यात 848 रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया

विशाल पाटील
सोमवार, 28 मे 2018

सातारा - जिल्ह्यातील लोकांचे आरोग्य निरामय व्हावे, ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार, शस्त्रक्रिया व्हाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेने मार्चमध्ये महाआरोग्य मेळावा घेतला होता. यामध्ये तब्बल १६ हजार ६४६ रुग्णांची तपासणी केली होती. त्यातील ८४८ रुग्णांवर शस्त्रक्रियेची आवश्‍यकता असून, जून, जुलैमध्ये त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. 

सातारा जिल्हा परिषदेने यावर्षी प्रथमच जिल्हा परिषद मैदानावर महाआरोग्य मेळावा घेतला होता. या मेळाव्यात सात हजार रुग्ण सहभागी होतील, अशी आशा असताना तब्बल साडेसोळा हजार रुग्ण सहभागी झाले. त्यातून किती रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे आवश्‍यक आहे, त्याचे नियोजन केले आहे. जून, जुलैमध्ये या रुग्णांवर कृष्णा मेडिकल कॉलेज कऱ्हाड, जे. जे. हॉस्पिटल मुंबई, बी. जे. मेडिकल कॉलेज पुणे, सह्याद्री हॉस्पिटल पुणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, संजीवन हॉस्पिटल सातारा, सातारा हॉस्पिटल सातारा, ॲन्को लाइफ केअर हॉस्पिटल सातारा, सह्याद्री हॉस्पिटल कऱ्हाड या रुग्णालयांमार्फत मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी आरोग्य विभाग काम करत आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री सहायता निधी व चॅरिटेबल ट्रस्टचा यासाठी निधी उभा केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. भगवान पवार यांनी दिली. 

सर्वाधिक रुग्ण साताऱ्यातील
शस्त्रक्रियेची आवश्‍यकता असलेल्या रुग्णांमध्ये जावळीतील ५५, कऱ्हाड ८६, खंडाळा १९, खटाव ६६, कोरेगाव ११३, महाबळेश्‍वर १०, माण २४, पाटण ८९, फलटण ३८, सातारा २००, वाई ३६, लातूरमधील दोन व इतर ११० रुग्णांचा समावेश आहे. 

शस्त्रक्रियांची संख्या 
बालरोग ४६, स्त्रीरोग ७८, मेडिसीन ९१, प्रयोगशाळा दोन, ईसीजी तीन, हृदयरोग ३९, क्षयरोग/दमा १६, जनरल सर्जरी ६८, मूत्ररोग ३०, मानसोपचार पाच, नेत्ररोग ११०, दंतरोग १५, कर्करोग २४, कान/नाक/घसा २०१, त्वचा २९, आयुष दोन, आयुर्वेद दोन, अस्थिरोग ७८.

Web Title: satara news Surgery for 848 patients in district