मोरगिरीत आढळला स्वाइन फ्लू संशयित 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

पाटण - मोरगिरी येथे स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण आढळला असून, त्याला कऱ्हाड येथील सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. वैद्यकीय सूत्रांनी या माहितीला दुजोरा दिला. मोरगिरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. डी. जाधव यांना त्याची माहिती देण्यात आली आहे. 

स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागही तातडीने कामाला लागला आहे. मोरगिरीत प्रत्येक घरात जाऊन तपासणी केली जात आहे. संशयित आढळल्यास लगेच उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले जात आहे. सरपंच अशोक मोरे यांनी स्वाइन फ्लूबाबत वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Web Title: satara news swine flu