कऱ्हाड : स्वाइन फ्लूचे आढळले १४ रूग्ण

सचिन शिंदे
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

दोन दिवसात सहा रूग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. काही खासगी रूग्णालयात स्वाइन फ्लू सदृश्य रूग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागही त्याचा सर्व्हे करत आहे.

कऱ्हाड : शहरात स्वाइन फ्लूचे १४ रूग्ण येथे आढळले आहेत.

वेगवेगळ्या रूग्णालयात  ४४ लोकांना ताप येणे, अंग दुखणे अशा लक्षणांचा त्रास होवू लागला आहे. त्यांच्याव वेगवेगळ्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील १४ लोकांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे उपजिल्हा रूग्णालयातून सांगण्यात आले. स्वाइन फ्लूचा वाढता त्रास लक्षात घेवून प्रत्येक रूग्णालयात स्वतंत्र कक्ष उघडण्यात आले आहेत. यापूर्वी त्या आजाराने तिघांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स