वयाच्या घोळात बदल्यांचा गोंधळ...

प्रवीण जाधव 
बुधवार, 6 जून 2018

सातारा - शिक्षकांच्या बदल्यांचा गोंधळ सुरू असतानाच शासनाने नुकत्याच आरोग्य विभागातील जिल्हा शल्यचिकित्सक संवर्गातील केलेल्या बदल्यांमध्ये गोंधळ झाला आहे. एकीकडे निवृत्तीचे वय वाढवत असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वयाची योग्य माहिती न घेता केलेल्या बदल्यांमुळे अनेक आदेश बदलावे लागणार आहेत. त्यामध्ये सातारच्या जिल्हा शल्यचिकित्सकांचाही समावेश आहे.

शिक्षण विभागात बदल्यांचा गोंधळ दीड वर्षापासून सुरू आहे. नेमका तसाच प्रकार सावळागोंधळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांतही झाला आहे. त्यामुळे बदल्यांच्या याद्या करणाऱ्या कारकुनांच्या कामावर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमी संख्या, नव्याने शासकीय सेवेत येण्याच्या अनुउत्सुकतेवर मार्ग काढण्यासाठी निवृत्तीचे वय वाढविण्याचा सपाटा शासनाने लावला आहे. मात्र, याबाबतचा निर्णयही वेळेत घेतला नाही. ३१ मे रोजी बरेच वैद्यकीय अधिकारी निवृत्तीच्या मार्गावर होते. निवृत्तीचे वय ५८ वरून ६० होण्याची अनेकजण वाट पाहात होते. तर, काही जण तसे होऊ नये याची वाट पाहात होते. कारण निवृत्तीचे वय न वाढल्यास सेवाज्येष्ठता यादीत वरचे स्थान मिळणार होते. 

शासनाने अगदी शेवटच्या दिवशी अध्यादेश काढून जिल्हा शल्यचिकित्सक संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ६० केले. त्यानुसार ३१ मेला या संवर्गातील ३० वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. मात्र, या याद्यांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची वयाची मर्यादा अद्ययावत करण्यात आली नव्हती. त्यामुळे काही अधिकाऱ्यांचा निवृत्तीचा कालावधी शिल्लक असतानाही त्यांच्या बदल्या या आदेशाद्वारे करण्यात आल्या. जिल्हा शल्यचिकित्सक श्रीकांत भोई यांचा ६० वर्षांच्या नियमानुसार निवृत्त होण्यासाठी अद्याप दोन महिन्यांचा कालावधी आहे. तरीही ३१ मेच्या बदली आदेशात सातारा जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून वडगाव (पुणे) येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोद गडीकर यांची नियुक्ती दाखवण्यात आली. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी शासनाला माहिती दिली. त्यानंतर आता हे आदेश बदलण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सकपदी आता श्रीकांत भोईच राहणार आहेत.

दोन अधीक्षकांच्याही बदल्या
बदल्यांच्या आदेशानुसार महाबळेश्‍वरचे वैद्यकीय अधीक्षक नितीन तडस यांची उंडाळे तर, उंडाळे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक राजू शेंडगे यांची वाईच्या ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अन्य रिक्त जागांवर मात्र, वैद्यकीय अधीक्षक देण्यात आलेले नाहीत.

Web Title: satara news teacher transfer issue