कऱ्हाड : शिक्षक सोसायटीच्या वार्षिक सभेत गोंधळ

सचिन शिंदे
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

कऱ्हाड, पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीत काही वर्षांपासून शिक्षाकांचा वाद होत असतो. दोन वर्षापूर्वीच सोसायटीत सत्तांतर झाले आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी तत्कालीन सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी अनेक मुद्दे चर्चेत आणले होते. आजही तशीच जोरदार चर्चा आज येथे झालेल्या वार्षिक सभेत जाली. संस्थेचा शाखा विस्तार करण्यात आला, तो अनावश्यक होता, असा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी चर्चेस सुरवात केली.

कऱ्हाड : येथील कऱ्हाड, पाटण शिक्षक सोसायटीच्या इमारत नुतनीकरण, थकबाकी आणि शाखा विस्ताराच्या विषयावरून आज (सोमवार) झालेल्या वार्षिक सभेत सत्ताधारी व विरोधकांत गोंधळ उडाला. चर्चेतून सत्ताधारी व विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली त्यातून झालेली चर्चा हमरीतुमरीवर आली. त्यामुळे वार्षिक सभा गोंधळातच पार पडली.

येथील कऱ्हाड, पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीत काही वर्षांपासून शिक्षाकांचा वाद होत असतो. दोन वर्षापूर्वीच सोसायटीत सत्तांतर झाले आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी तत्कालीन सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी अनेक मुद्दे चर्चेत आणले होते. आजही तशीच जोरदार चर्चा आज येथे झालेल्या वार्षिक सभेत जाली. संस्थेचा शाखा विस्तार करण्यात आला, तो अनावश्यक होता, असा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी चर्चेस सुरवात केली. त्याचवेळी संस्थेच्या इमारतीचे नूतनीकरणचा मुद्दाही गाजला. बोगस कर्ज वितरण, थकीत कर्ज वसुली मुद्दाबाबत संस्थेच्या वार्षिक सर्व साधारण सभेत वादळी चर्चा रंगली. त्याची व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून रंगली होती. त्याचे पडसाद सभेतही दिसले.

संस्थेचे अध्यक्ष बाजीराव शेटे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या सभागृहात झालेली सर्वसाधारण सभा अंदाजानुसार वादळी झाली. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष संजय शेजवळ, अंकुश नांगरे यांच्यासह संचालक, प्रदीप रेवलेकर, महेंद्र जानुगडे उपस्थित होते. यावेळी झालेल्या विविध विषयांवरील चर्चेत शाखा विस्तार, इमारतीचे नुतनीकरण, बोगस कर्जप्रकऱणे असे अनेक वादग्रस्त मुद्दे चर्चेत आले. वादळी चर्चेदरम्यान आरोप-प्रत्यारोपातून चांगलाच कलगी-तुरा रंगला. यामुळे काहींचा तोल सुटून धराधरी झाली. या गोंधळातच काही ज्येष्ठांनी मध्यस्थी केली. त्याच वातवरणात वदें मातरम म्हणून सभा गुंडळली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :