कऱ्हाड: पालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या बदलीबाबत घोळ

सचिन शिंदे
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

आयुक्त श्री. दळवी यांनी आज येथे भेट देऊन बैठक घेतली. त्यानंतर दक्ष नागरीकांनी त्यांच्या मागणीचो निवेदन त्यांमा दिले. दक्ष नागरीक म्हणून येथे वाॅटस् ग्रुप झाला आहे. त्या ग्रुपवर पालिकेच्या विविध विषयांवर चर्चा होत असते. सध्या पालिकेचे मुख्याधिकारी औंधकर यांच्या बदलीवरून मतप्रवाह सुरू आहेत.

कऱ्हाड : येथील पालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या बदलीबाबत दोन महिन्यापासून घोळ सुरू आहे. त्यामुळे लोकांची कामे खोळंबली आहेत. विकासही खुंटला आहे. त्यामुळे त्या प्रकरणाची मुळापर्यंत जावून त्या प्रकरणाचे शासकीय आॅडीट करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी येथील दक्ष नागरीकांतर्फे आज आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याकडे निनेदनाद्वारे करण्यात आली.

आयुक्त श्री. दळवी यांनी आज येथे भेट देऊन बैठक घेतली. त्यानंतर दक्ष नागरीकांनी त्यांच्या मागणीचे निवेदन त्यांना दिले. दक्ष नागरीक म्हणून येथे व्हॉटस्ग्रुप झाला आहे. त्या ग्रुपवर पालिकेच्या विविध विषयांवर चर्चा होत असते. सध्या पालिकेचे मुख्याधिकारी औंधकर यांच्या बदलीवरून मतप्रवाह सुरू आहेत. दोन महिन्यांपासून तो वाद चांगलाच रंगला आहे. त्यात राजकीय गटा तटातूनही ताकद दाखवली जात आहे. त्याच सगळ्या प्रकाराची सखोल चौकशीसह त्याचे शासकीय आॅडीट करण्याची मागणी झाली आहे. त्याचे निवेदन दक्षतर्फे देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

शासकीय अधिकाऱ्यांची बदली करण्याचा अथवा त्यांच्या चौकशीचा अधिकार लोकप्रतिनिधींना असतो का, याचा खुलासा करावा. मुख्याधिकारी औंधकर यांच्या बदलीच्या घोळाने विकास कामे रखडली आहेत. लोकभावनांचा विचार करून त्यांची बदली करू नये. त्या उलट या प्रकरणाची सखोल चौकशी करून शासकीय आॅडीट करावे. तसेच पालिकेच्या प्रत्येक विभागाचीही चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.