नांगरे पाटीलसाहेब साताऱ्याच्या रस्त्यांवर नाकासमोरुन पळा !

सिद्धार्थ लाटकर
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

सातारा ः फिटनेस आयकॉन म्हणून प्रसिद्ध असलेले कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील हे रविवारी (ता.10) साताऱ्यात मॅरेथॉन असोसिएशन साताराने आयोजिलेल्या लॉंग रनमध्ये सहभागी होऊन साताऱ्याच्या रस्त्यांवर धावणार आहोत. नांगरे पाटील साहेबांनी आता मात्र नाकासमोरुन धावले तर बरे होईल नाहीतर पून्हा त्यांची नजर टपऱ्या, हातगाडे अशा अतिक्रमणांवर पडेल अन काही महिन्यांपुर्वी व्यक्त त्याबाबत व्यक्त केलेला खेद उफाळून येईल.

रविवारी पोलिस कवायत मैदानावरुन सकाळी सहा वाजल्यापासून लॉंग रनला प्रारंभ होईल. साताराच्या रस्त्यांवर पळताना सकाळच्या प्रहरी नांगरे पाटील यांना शहरातील लोकांना चालण्यासाठी फुटपाथ आहेत आपण ते खोकी, गाडे आणि दुकानांसाठी आहेत हे पहावयास मिळाले तर त्यांनी नवल वाटून घेऊन नये. आज ही आमचे लोक रस्त्यावरुनच चालतात बर का. तुमचा धावण्याचा मार्ग बसस्थानक परिसरात असता तर तुम्हांला रस्त्यातच आडव्यातिडव्या उभ्या असणाऱ्या रिक्षा, वडापच्या गाड्या, फळ विक्रेत्यांनी व्यापलेला फुटपाथ पहावयास मिळेल. आपल्या डोळसपणामुळे फूटपाथ मोकळे करण्याची ऑर्डर आपण पोलिस विभागाला दिली. त्यांनी ही तत्परतेने कार्यवाही केली पण आता ये रे माझ्या मागल्या. असो. त्यात तुमचा ही काही दोष नाही. आमचे येथील प्रशासनास (जिल्हाधिकारी, पोलिस विभाग, आरटीओ, पीडबल्यूडी, पालिका) त्यात काहीच चुकीचे वाटत नाही. यामुळे आपण साताऱ्याच्या रस्त्यांवर इकडे-तिकडे न पाहता सरळ नाका पूढे पळा एवढेच.