सातारा : वाई नगराध्यक्षांना लाचखोरीबद्दल पतीसह अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

शिंदे या भारतीय जनता पक्षाकडून थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. संबंधित तक्रारदाराने वाई पालिकेच्या हद्दीतील शौचालयाचे बांधकाम केले होते. त्याचे बिल काढण्यासाठी दांपत्याने 14 हजार रुपयांची मागणी केली होती.

सातारा : शौचालयाच्या बांधकामाचे बिल काढून देण्यासाठी 14 हजार रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी वाईच्या नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे व त्यांचे पती सुधीर शिंदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (शुक्रवार) ताब्यात घेतले आहे. सौ. शिंदे या भारतीय जनता पार्टीकडून थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. 

संबंधित तक्रारदाराने वाई पालिकेच्या हद्दीतील शौचालयाचे बांधकाम केले होते. त्याचे बिल काढण्यासाठी दांपत्याने 14 हजार रुपयांची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

त्यानंतर आज सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई उपअधिक्षक सुहास नाडगौंडा व पथकाने केली. या घटनेने जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.