साताराः टेम्पोच्या धडकेनंतर स्लॅब कोसळल्याने युवकाचा मृत्यू

सचिन शिंदे
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

कऱ्हाड (सातारा): टम्पो मागे घेताना तो घराच्या पॅराफीटच्या पिलरला धडकला त्यानंतर त्याचा स्लॅब अंगावर कोसळल्याने येथील मंगळवार पेठेतील युवक जागीच ठार झाला. पुणे-कोथरूड येथे मध्यरात्री दीडच्या सुमारास घटना घडली. सुशांत सतीश लाड (वय 22 रा. कमळेश्वर मंदीर परिसर, मंगळवार पेठ) असे त्याचे नाव आहे.

कऱ्हाड (सातारा): टम्पो मागे घेताना तो घराच्या पॅराफीटच्या पिलरला धडकला त्यानंतर त्याचा स्लॅब अंगावर कोसळल्याने येथील मंगळवार पेठेतील युवक जागीच ठार झाला. पुणे-कोथरूड येथे मध्यरात्री दीडच्या सुमारास घटना घडली. सुशांत सतीश लाड (वय 22 रा. कमळेश्वर मंदीर परिसर, मंगळवार पेठ) असे त्याचे नाव आहे.

कोथरूडला तो प्रिटींगच्या व्यवसायनिमित्त आहे. फ्लेक्सचा टम्पो मागे घे, असे चालकाला सांगण्यासाठी तो ज्या पॅरफीटच्या स्लॅब खाली थांबला त्यालाच टम्पो धडकल्याने स्लॅब सशांतच्या अंगावर कोसळून दुर्घटना झाली. सुशांत लाड येथील मंगळवार पेठेत राहतो. तो हुमान गणेश मंडळाचा कार्यकर्ता आहे. सहा मिहन्यापासून त्याने कोथरूड येथे त्याच्या मित्रासमवेत फ्लेक्स प्रिटिंगचा व्यवसाय सुरू कोला होता. त्यामुळे तो तिकडेच होता. येथे घरी आई, वडील व भाऊ होते. कोथरूडला काल रात्री फ्लेक्स बरून नेण्यासाठी टेम्पो आला होता. ते त्यांनी भरला. त्यानंतर टेम्पो मागे घेण्याचे चालले होते. त्यावेळी तो मागे थांबून चालाकला सांगत होता. तो पॅरफीट खाली थांबला होता. तेथून तो सांगत होता. टम्पो मागे घेताना टम्पो दहा फुटाच्या पॅराफीटच्या पिलरला धडकला. त्यावेळी पॅराफीटचा स्लॅब थेट सुशांत लाडच्या अंगावर प़डला. त्यात तो जागीच ठार झाला.

आज (शुक्रवार) सकाळी त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या अपघाताची माहिती समजताच येथून त्याचे आप्त व मित्र परिवार कोथरूडला गेले होते. सायंकाळी त्याचा मृतदेह येथे आणण्यात आला. त्यानंतर सायंकाळनंतर येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

सदाभाऊ यांचा अखेर 'सवतासुभा'

इनक्‍युबेटरचा सरसकट वापर अनावश्‍यक

ओडिशात आघाडी करणार नाही: अमित शहा

फिरोज, ताहीर यांना फाशीची शिक्षा

श्रुती बडोले यांनी शिष्यवृत्ती अर्ज घेतला मागे

उच्चशिक्षण क्षेत्रासमोरच्या आव्हानांवर चिंतन

बैलांच्या शर्यतींबाबतचा मसुदा अंतिम टप्प्यात

तरंगत्या सौर पॅनेलद्वारे 'उजनी'वर ऊर्जानिर्मिती शक्‍य

हिंसाचाराला "डेरा'चे आर्थिक पाठबळ

कोमलला मिळाले मदतीचे ‘हृदय’