अनुसूचित जातीसाठी राखीव प्रभागातील "अ' जागा 

विजयकुमार सोनवणे - सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

सोलापूर - महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जातीसाठी राखीव प्रभागातील "अ' जागा असणार आहे. याच पद्धतीने प्रत्येक आरक्षणासाठी "ब', "क' आणि "ड'चे आरक्षण असणार आहे. आरक्षणाची सोडत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली काढली जाणार आहे. 

सोलापूर - महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जातीसाठी राखीव प्रभागातील "अ' जागा असणार आहे. याच पद्धतीने प्रत्येक आरक्षणासाठी "ब', "क' आणि "ड'चे आरक्षण असणार आहे. आरक्षणाची सोडत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली काढली जाणार आहे. 

आरक्षणाची पद्धत निवडणूक आयोगाने निश्‍चित केली आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभागात उपलब्ध असलेली पहिली जागा ही त्या-त्या प्रवर्गासाठी आरक्षित केली जाणार आहे. उदा. प्रभाग क्रमांक पाच व 17 हे अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यास, या प्रभागातील पाच अ आणि 17 अ या जागा अनुसूचित जातीसाठी राखीव असतील. त्यानंतर अनुसूचित जमातीच्या उतरत्या क्रमाने प्रभाग 17 हाच अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होत असल्यास "17 ब' ही जागा या प्रवर्गासाठी आरक्षित होणार आहे. 

महापालिका निवडणुकीसाठी 102 जागा निश्‍चित आहेत. त्यानुसार एकूण 26 प्रभाग होणार असून, 24 प्रभाग हे प्रत्येकी चार, तर दोन प्रभाग हे प्रत्येकी तीन सदस्यांचे होणार आहेत. त्यापैकी 14 जागा अनुसूचित जातीसाठी, तर दोन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव असतील. या दोन्ही प्रवर्गाचे आरक्षण निश्‍चित झाले असून, निश्‍चित प्रभागापैकी महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभागांचे आरक्षण काढले जाणार आहे. ज्या प्रभागातील "अ' जागांच्या चिठ्ठ्या निघतील, त्यापैकी सात जागा महिलांसाठी राखीव होतील. हीच पद्धत अनुसूचित जमातीसाठी असून, एक जागा महिलेसाठी राखीव होणार आहे. 

असे असेल प्रभागांतील संभाव्य आरक्षण (प्रवर्गनिहाय) 
प्रवर्ग जागा महिला पुरुष 
अनुसूचित जाती (एससी) 14 07 07 
अनुसूचित जमाती (एसटी) 02 01 01 
इतर मागास (ओबीसी) 28 14 14 
खुले (ओपन) 58 29 29 
--------------------------------------------------------------- 
एकूण 102 51 51