शिक्षक, अल्पवयीन मुलाचा शाळकरी मुलीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 ऑक्टोबर 2016

विटा - करंजे (ता. खानापूर) येथे एका १३ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीवर शिक्षक व एका अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या बलात्कारप्रकरणी संबंधित शिक्षक गायकवाड व अल्पवयीन मुलगा अशा दोघांविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

विटा - करंजे (ता. खानापूर) येथे एका १३ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीवर शिक्षक व एका अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या बलात्कारप्रकरणी संबंधित शिक्षक गायकवाड व अल्पवयीन मुलगा अशा दोघांविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

या प्रकरणातील मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची रवानगी सांगलीच्या बालनिरीक्षणगृहात केली आहे; तर गायकवाडला उशिरापर्यंत अटक झाली नव्हती. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २२ सप्टेंबर २०१६ रोजी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान शाळेतील गायकवाडने ‘‘तुझ्या पप्पांनी बोलवले आहे,’’ असे म्हणून मुलीला एका शेतात नेले. तिथे गायकवाडने व संबंधित मुलाने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. या प्रकारानंतर २७ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्या मुलाने पीडित मुलीला शाळेतील सातवीच्या वर्गाच्या बाजूस असणाऱ्या अडगळीच्या खोलीत नेले. मुलीला तिच्या घरच्या लोकांना मारण्याची धमकी देत जबरदस्तीने बलात्कार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार गायकवाड आणि त्या मुलाविरूद्ध बलात्कार, लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम आणि दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित मुलास ताब्यात घेतले आहे. त्याला विशेष न्यायालयासमोर हजर केले असताना सांगलीतील बालनिरीक्षणगृहात दाखल करण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिला. गायकवाडला उशिरापर्यंत अटक झाली नव्हती. सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे तपास करीत आहेत. शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याच्या घटनेने गावातील नागरिक, पालक वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, आज सायंकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी अमरसिंह निंबाळकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन जाधव, सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली.
 

या गुन्ह्याचा कसून तपास सुरू आहे. गुन्हा दाखल झालेल्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले होते. बालनिरीक्षणगृहात त्याची रवानगी केली आहे. तसेच प्रकरणातील गायकवाडचा शोध सुरू आहे.
- स्वप्नील घोंगडे, सहायक पोलिस निरीक्षक

पश्चिम महाराष्ट्र

हुपरी (कोल्हापूर) : वंदे मातरम् म्हणण्यास नकार दर्शविल्याच्या निषेधार्थ समाजवादी पक्षाचे नेते खासदार अबू आझमी यांच्या प्रतिकात्मक...

06.24 PM

साताराः रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॅाडी सदस्यपदी मुस्लीम बॅकवर्ड क्लासेस ऑग्रनायझेस, इंडीयाचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शौकत...

05.06 PM

कर्‍हाड:  कोयना धरणाच्या पाणलोट पडणाऱ्या पावसामुळे जलाशयातील पाणीसाठा नियंत्रीत ठेवणेसाठी कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातुन...

10.00 AM