‘शाळा सिद्धी’ची तपासणी सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

सातारा - शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या शाळा सिद्धी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात शाळांची तपासणी सुरू झाली आहे. वीस दिवस चालणाऱ्या या मोहिमेत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सुमारे ६५ शाळांनी दिलेल्या माहितीची सत्यता व पडताळणी परजिल्ह्यातील पथकामार्फत सुरू आहे. जिल्ह्यात ‘अ’ श्रेणीत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची संख्या अधिक आहे. खासगी शाळांचे प्रमाण मात्र इतर शाळांच्या तुलनेत कमी आहे. 

शिक्षण विभागाकडून राज्यातील शाळांना ‘शाळा सिद्धी’ उपक्रमात ऑनलाइन माहिती भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी विहित नमुन्यात माहिती आणि भौतिक सुविधांबाबतचा तपशील ऑनलाइन दिला आहे. विहित १६ प्रकारच्या नमुन्यांमध्ये भरलेल्या माहितीवरून संबंधित शाळांना श्रेणी देण्यात आली आहे. या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाची परिपूर्ण माहिती देऊन संबंधितांना त्या आधारावर विशेष श्रेणी मिळाली आहे. 

सोमवारपासून (ता. दहा) ही तपासणी सुरू झाली असून, ता. २७ एप्रिलपर्यंत शाळांची तपासणी करण्यात येणार आहे. त्याबाबतचे वेळापत्रक विद्या प्राधिकरणाचे संचालक धीरजकुमार यांनी निश्‍चित केले आहे. परजिल्ह्यातील मूल्यनिर्धारक पडताळणीसाठी आले असून, संबंधित शाळेने भरलेल्या माहितीची शहानिशा करत आहेत. या तपासणीच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सुमारे ६५ शाळांचा समावेश आहे. शाळा सिद्धीत भरण्यात आलेली माहिती व भौतिक सुविधा कशाप्रकारे आहे, तसेच शालेय गुणवत्तावाढीसाठी कोणते नावीन्यपूर्ण उपक्रम घेण्यात आले यालाही विशेष महत्त्व देण्यात येत आहे. विविध १६ प्रकारच्या माहितीची पथक प्रत्यक्ष एका शाळेवर दोन दिवस जाऊन पडताळणी सुरू आहे. साताऱ्यातील शिक्षक या पडताळणीसाठी पुणे जिल्ह्यातील काही शाळांवर जाणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागातून  देण्यात आली. 

Web Title: School success program