वैराग येथील दुय्यम निबंधक कार्यालयात निघाला साप

The serpent escaped to the sub registrar office of Vairag
The serpent escaped to the sub registrar office of Vairag

वैरागता : वैराग (ता.बार्शी) येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दीच्या वेळेत अचानक साप निघाला. मंगळवार (ता.18) दुपारी साप निघाल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये मोठी पळापळ झाली. तर कामासाठी आलेल्या नागरिकांमध्ये घबराट पसरली. अखेर सर्प मित्राने अडीच ते तीन तासानंतर त्या सापाला बाटली बंद केल्याने सर्वानी सुटकेचा श्वास सोडला.

वैराग येथील दुय्यम निबंधक कार्यालयात ७४ गावांचे खरेदी विक्रीचे कामकाज नेहमीप्रमाणे चालू होते. दस्त करण्यासाठी वैराग, ढोराळे, सासुरे, यावली, घाणेगाव येथील लोकांची मोठी गर्दी झालेली होती. दुपारपर्यंत सर्व व्यवहार सुरळीत चालू होते. त्याचदरम्यान दुपारी दीड वाजण्याचे दरम्यान कार्यालयीन इमारतीच्या गेटमधून आत प्रवेश करताना साप आढळून आला. सापाला पाहताच अनेकांची भंबेरी उडाली आणि एकच पळापळ उडाली.

दरम्यान, सर्पमित्राला बोलावण्यात आले. सर्पमित्र संकेत ठेंगील यांनी तातडीने कार्यालयात येऊन सापाला पकडून बाटली बंद केली आणि लोकांचा जीव भांड्यात पडला. हा साप तीन फुट लांबीचा कवड्या जातीचा होता. तो बिनविषारी असल्याचे सर्पमित्र संकेत ठेंगील यांनी सांगितले. त्या सापाला शेतात सुरक्षितस्थळी सोडण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com