दिवसात सात लाखांची कर वसुली 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

कऱ्हाड - ग्रामपंचायतीच्या कर वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मध्यंतरी नव्याने कर आकारणीमुळे धिम्या गतीने सुरू असलेली वसुली सध्या गतीने सुरु आहे. विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवकांच्या नेमलेल्या 20 पथकांनी तब्बल सात लाखांवर वसुली एकाच दिवसात केली. कर न भरलेल्या 148 कुटुंबाची नळ कनेक्‍शनही तोडण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांनी दिली. 

तालुक्‍यातील 199 ग्रामपंचायतींपैकी ज्या ग्रामपंचायतींची वसुली 90 टक्‍क्‍यांपेक्षा कमी झाली आहे, त्या गावांमध्ये प्रामुख्याने ही धडक मोहीम राबवण्यात येत आहे. त्यासाठी ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांचे पथक तयार करण्यात आले आहे. मोहीम स्वरूपात ही वसुली सुरू असून, काल (ता. 15) रिसवड ग्रामपंचायतीचे 46 हजार 700, वाघेश्‍वर 12 हजार 500, वडगाव- उंब्रज 26 हजार 380, बनवडी एक लाख 36 हजार 432, काले एक लाख 24 हजार 324, कासारशिरंबे 37 हजार 356, खराडे 58 हजार, शामगाव 63 हजार 130, अंतवडी एक लाख 37 हजार 342, शिरवडे 23 हजार 687, पाडळी- हेळगाव 37 हजार 200 रुपये वसूल करण्यात आले. त्याचबरोबर शामगामधील- 11, अंतवडी- 39, रिसवड- 14, खराडे- 25, बेलवाडी- 15, पार्ले- 37 आणि कोणेगावमधील सात नळ कनेक्‍शनही तोडण्यात आली. पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या सहकार्याने राबण्यात येत असलेल्या या मोहिमेमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. 

ज्या ग्रामपंचायतीची वसुली 90 टक्‍क्‍यांच्या पुढे आहे त्यांना कर्मचारी वेतन अनुदान देय आहे. शासनाच्या 14 वा वित्त आयोग योजनेसाठी कर वसुलीच्या प्रमाणात जादा सहायक अनुदान मिळेल. त्यामुळे ग्रामपंचायतींनी वसुलीसाठी सहकार्य करावे. 

- अविनाश फडतरे, गटविकास अधिकारी, कऱ्हाड 

Web Title: Seven lakh tax collection days