‘चुप्पी तोडो’चा नारा घुमला सोलापुरात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

सोलापूर - लहान मुलांच्या होणाऱ्या लैंगिक शोषणाविरुद्ध चुप्पी तोडोचा आवाज रविवारी (ता. २६) शहरात घुमला. कॅक्‍टस फाउंडेशनतर्फे आयोजित या उपक्रमास सोलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.

सोलापूर - लहान मुलांच्या होणाऱ्या लैंगिक शोषणाविरुद्ध चुप्पी तोडोचा आवाज रविवारी (ता. २६) शहरात घुमला. कॅक्‍टस फाउंडेशनतर्फे आयोजित या उपक्रमास सोलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.

चुप्पी तोडो रॅलीचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी रणजित कुमार, पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांच्या हस्ते फीत कापून व हवेमध्ये फुगे सोडून करण्यात आले. ही रॅली जुना एम्प्लॉयमेंट चौक, डफरीन चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, चार हुतात्मा पुतळा चौक अशा मार्गांनी काढण्यात आली. रॅलीमध्ये विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या उपक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. लैंगिक अत्याचाराविरुद्ध बालकांनी व त्यांच्या पालकांनीही बोलावे. सहन केल्यास अत्याचार आणखी वाढू शकतो. 

या रॅलीत सुमारे पाचशे पोलिसांचा लक्षणीय सहभाग होता. ‘एक बेहतर कल बनाना है बाल लैंगिक शोषण को जड से मिटाना है’, ‘बाल लैंगिक शोषण खत्म करना सबकी जिम्मेदारी’, ‘सुरक्षित बचपन हर बच्चे का अधिकार’ या घोषणा दिल्या.

Web Title: sexual exploitation of children