राशीन - शतचंडी महोत्सवानिमित्ताने सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी

दत्ता उकिरडे
शनिवार, 21 एप्रिल 2018

राशीन (नगर) : येथील जगदंबा देवीच्या शतचंडी महोत्सवा निमित्ताने मंदिरात सप्ताहभर सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी हमीद सय्यद व सहकाऱ्यांचा भारुडाचे रंगी, रविवारी गोदावरी मुंढे यांची भक्तीगीते, सोमवारी बीड येथील विनोदाचार्य बाबासाहेब इंगळे यांचे नाचू कीर्तनाचे रंगी, मंगळवारी ज्ञानेश्वर पानसरे व बंडोपंत पानसरे यांची भजनसंध्या होईल. 

बुधवारी अपर्णा रामतीर्थकर यांचे कुटुंबातील संवाद व नातेसंबंध या विषयावर व्याख्यान यासह दररोज महापूजा, सप्तशतीपाठ, देवी भागवत, आरती मंत्र पुष्पांजली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी पूर्णाहुती झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. शनिवारी (ता.२८) देवीची पक्षाळपूजा होऊन या महोत्सवाची सांगता होईल.

Web Title: shatchandi mahotsav in rashin