सत्तेसमोर मैत्री, हितसंबंध, नातीही फिकी

शिवाजीराव चौगुले 
बुधवार, 17 मे 2017

शिराळा - राजकारणात नाती, भावना यांना स्थान असत नाही. सत्तेपुढे नाती, मैत्री, हितसंबंध फिके पडून क्षणापुरतं का होईना दुरावा निर्माण होतो. तीच स्थिती नगरपंचायत निवडणुकीत झाली. 

राजकारणासमोर रक्‍ताची नाती विसरून सत्तेसाठी नाईक, निकम, कदम या घराण्यांनी वेगवेगळ्या पक्षाच्या पताका हाती घेऊन राजकीय लढाईला सुरवात केली आहे.

नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी यंत्रणा गतिमान झाली आहे. कोपरा सभांना बगल देऊन उमेदवार व कार्यकर्त्यांनी थेट मतदारांपर्यंत पोचून निवडणूक चिन्ह बिंबवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. 

या वेळी सत्तेसाठी अनेक ठिकाणी एकाच घराण्यातील उमेदवार आमनेसामने असल्याने ‘कोणाला मतदान करायचे’ या प्रश्‍नाने नातलगांची पंचायत झाली आहे. ‘मत एक पाहुणे तीन’. मग कोणाचा विचार करायचा हे त्यांच्या समोर आव्हान आहे. पाहुण्यापेक्षा पक्ष व विचाराचा कोण, यावर लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्‍यता आहे.

चुलते पुतणे, सख्ख्या जावा
प्रभाग दोनमधून अभिजित नाईक यांची भाजपमधून तर त्यांचे चुलत पुतणे माजी ग्रामपंचायत सदस्य विश्‍वप्रतापसिंह नाईक यांची राष्ट्रवादीतून उमेदवारी आहे. प्रभाग पाचमधून भाजपाच्या कुसुम निकम, काँग्रेसच्या मनस्वी निकम तर राष्ट्रवादीच्या सुनीता निकम यांची उमेदवारी असल्याने येथे चुलत सासू व जावा जावा यांच्यात लढत आहे. कदम घराण्यातील तीन सख्या जावांना उमेदवारी मिळाली आहे. प्रभाग आठ मधून काँग्रेसमधून महादेव कदम यांच्या पत्नी अर्चना कदम यांच्या विरोधात भाजपचे दिलीप कदम यांच्या पत्नी नंदाताई कदम यांची उमेदवार आहे. सख्ख्या जावा एकमेकींविरोधात आहेत. शंकर कदम यांच्या पत्नी छायाताई कदम काँग्रेसच्या उमेदवार म्हणून प्रभाग १३ मधून रिंगणात आहेत.