शिराळा नागपंचमीची तयारी पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

शिराळा - येथील नागपंचमीसाठी नगरपंचायत व प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण झाली आहे. बंदोबस्तासाठी ४५० पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.  ४ उपविभागीय पोलिस अधिकारी, १४ पोलिस निरीक्षक, ३३ सहायक पोलिस निरीक्षक, ३६५ पोलिस कर्मचारी, ५९ महिला पोलिस, ५० वाहतूक पोलिस, ११ डॉल्बीविरोधी पथकांची नेमणूक केली आहे. मिरवणुकीवर १९ कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. बाँबशोधक व नाशक पथक, श्वान पथक, खिसेकापू विरोधी ४ पथके, गुंडाविरोधी विशेष पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण अशी विविध पथके स्थापून मिरवणूक मार्गावर १६ सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.

नागपंचमी उत्साहात साजरी करण्यासाठी नागमंडळे सरसावली आहेत. यावेळी मिरवणुकीसाठी पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर देण्यात येणार आहे. पाळणे, खाद्य पदार्थाचे व इतर दुकानांची गर्दी केली आहे. यात्रेकरूंची गैरसोय होऊ नये म्हणून शिराळा आगाराच्या वतीने जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.  वन विभागाने १६३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यात १ उपवनसंरक्षक, २ विभागीय वनाधिकारी, ४ सहायक वनसंरक्षक, १० वनक्षेत्रपाल, २३ वनपाल, ४५ वनरक्षक, ८० वनमजूर यांचा समावेश आहे. नाग मंडळांवर लक्ष ठेवण्यासाठी ९० कर्मचाऱ्यांची ५ पथके नेमली आहेत. त्यात १ वनक्षेत्रपाल, १ वनपाल, १ वनरक्षक, २ वनमजूर यांचा समावेश आहे. तालुक्‍यात प्रबोधनासाठी ७ गस्ती पथके आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने पाडळी रोड तळीचा कोपरा, कोकरुड रोड एसटी स्टॅंड, शिराळा बसस्थानक, यादव हार्डवेअर, नगर पंचायत, व्यापारी असोसिएशन हॉल, मांगले रोड या सात ठिकाणी आरोग्य पथके नेमली आहेत. सर्पदंशाच्या लसीचा पुरेसा साठा तयार ठेवला  आहे. विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी विद्युत वितरणने १० ठिकाणी पथके नेमली आहेत. स्वच्छता व औषध फवारणीचे काम गतीने सुरू आहे.