लांडगेवाडीत नव्वद ब्रास वाळू जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

33 लाखांचा दंड - कवठेमहांकाळच्या तहसीलदारांची कारवाई
शिरढोण - लांडगेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील तीन वाळू डेपोवर कवठेमहांकाळच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी छापा टाकून 90 ब्रॉस वाळू जप्त करून 33 लाख रुपयांचा दंड केला.

33 लाखांचा दंड - कवठेमहांकाळच्या तहसीलदारांची कारवाई
शिरढोण - लांडगेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील तीन वाळू डेपोवर कवठेमहांकाळच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी छापा टाकून 90 ब्रॉस वाळू जप्त करून 33 लाख रुपयांचा दंड केला.

सोमवारी पहाटे व सकाळी लांडगेवाडी येथील असलेल्या हनुमान मंदिरासमोर; तर मिरज-पंढरपूर राज्य मार्गालगत वाचनालयामागे आणि गावातील असलेल्या तानुबाई दत्तू कदम यांच्या प्लॉटमध्ये वाळूसाठा केला होता. याच प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात वाळूसाठा आढळला. तीनही वाळू डेपो हे धनाजी शिवाजी मुडदे यांचे असून, त्यांची या तीनही डेपोंमधील असणारी (90) ब्रॉस वाळू जप्त केली. सुमारे 33 लाख रुपये दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दिली.

पहाटे व सकाळी झालेल्या वाळूसाठा जप्त कारवाईत मंडल अधिकारी बी. एस. नागरगोजे व तलाठी आर. एस. कार्वे व पोलिस पाटील रामचंद्र कदम यांनी वाळूसाठ्याचा पंचनामा केला आणि तीनही डेपोंमधील असणारी वाळू जेसीबी मशिनद्वारे डंपरमध्ये भरून तहसील कार्यालयात ओतली. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी वांगीत वाळूतस्करांना चाप लावण्यास सुरवात केली. याचदरम्यान कवठेमहांकाळ येथील तहसीलदार ठोकडे यांनी मोठी मोहीम हाती घेत कवठेमहांकाळच्या पश्‍चिम भागातील लांडगेवाडी येथे वाळू डेपोवर छापा टाकून मोठी कारवाई केली. एकाच दिवसात धनाजी मुडदे यांनी साठ केलेल्या वाळूवर छापा टाकला आणि नव्वद ब्रॉस वाळू जप्त केली.

सुमारे तेहेतीस लाख दंड आकारला जाणार असल्याची शक्‍यता आहे.
दरम्यान, तहसीलदार ठोकडे यांनी नव्वद ब्रॉस असणाऱ्या वाळूवर ब्रॉसला 37 हजार रुपयांप्रमाणे दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती दिली.